मुंबई - निर्माते दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'शिकारा' चित्रपट अलीकडेच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांना एका रात्रीत बेघर झाल्यानंतर कशी परिस्थिती निर्माण झाली होती. हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंगही आयोजित करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते लाल कृष्ण आडवाणी यांनीही हा चित्रपट पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर ते भावूक झाले होते.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विधु विनोद चोप्रा यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी लाल कृष्ण आडवाणी यांचे आभार मानले आहे.
हेही वाचा -Public Review : 'शिकारा' हा फक्त चित्रपट नाही तर भावना, पाहा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
'शिकारा-अ लव्ह लेटर फ्रॉम काश्मीर', ही कथा काश्मीरच्या १९९० साली घडलेल्या घटनेवर आधारित आहे. काश्मीरच्या एका समुदायाला बेघर करण्यात आले होते. ३० वर्षानंतरही ते आपल्या घरी परतू शकले नाही. या चित्रपटातून नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सादिया आणि आदिल खान हे दोघेही या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले आहे. सादियाने शांतीची भूमिका साकारली आहे तर, आदिल शिवच्या भूमिकेत दिसत आहे. या चित्रपटाचं पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी दिलं आहे.
हेही वाचा -Box Office Collection: 'शिकारा'वर भारी पडला 'मलंग', जाणून घ्या पहिल्या दिवशीची कमाई