मुंबई - सध्या 'व्हॅलेन्टाईन विक' सुरू आहे. व्हॅलेन्टाईनच्या आठवड्यात बरेचजण आपल्या प्रेमाची कबुली देत असतात. यामध्ये कलाविश्वातील कलाकारही मागे नाहीत. आता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार भूषण प्रधान आणि पूजा सावंत या दोघांनीही त्यांचे काही रोमॅन्टिक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून दोघे एकमेकांना डेट करत आहेत की काय, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.


भूषण आणि पूजा दोघांनीही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे रोमॅन्टिक फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये दोघांचीही खास केमेस्ट्री दिसून येते. 'रोझ डे' निमित्ताने दोघांनी एकमेकांना शुभेच्छाही दिल्या आहेत. तर, 'प्रपोझ डे' निमित्त भूषणने फिल्मी पद्धतीने पूजाला प्रपोझ करतानाचा फोटो शेअर केला आहे.


त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. हे फोटो त्यांच्या आगामी कोणत्या चित्रपटाचे आहेत की कोणत्या म्यूझिक व्हिडिओचे, असे प्रश्न चाहते विचारत आहेत. मात्र, पूजा आणि भूषण यांनी याबद्दल काहीही उलगडा केलेला नाही. मात्र, त्यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. आता या फोटोमागे नेमके काय गुपीत दडले आहे, याची काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे.
- View this post on Instagram
Actions speak louder than words!! Need I say more? Happy Propose Day 💍❤️
">