ETV Bharat / sitara

स्लो मोशन गाण्यासाठी दिशाने घेतली हेलनकडून प्रेरणा

author img

By

Published : May 3, 2019, 5:42 PM IST

'भारत' चित्रपटातील स्लो मोशन या गाण्यातील दिशा पटाणीचा लूक हॉलिवूडचे डिझायनर एशले रेबेलो यांनी डिझाईन केला आहे. हेलेन यांच्या लूकवरून प्रेरणा घेत दिशासाठी हा लूक डिझाईन करण्यात आला आहे. त्यामुळेच या गाण्यातील तिचा लूक भडक असला, तरी तो सेन्श्युअस व क्लासी आहे, असे एशेल रेबेलो यांनी सांगतिले.

दिशाने घेतली हेलन कडून प्रेरणा

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचे 'भारत' चित्रपटातील स्लो मोशन गाणे सध्या चांगलेच गाजत आहे. या गाण्यातील दिशा पाटनीचा लूक व डान्सचीदेखील जबरदस्त चर्चा आहे. या गाण्यात तिला ज्येष्ठ अभिनेत्री हेलेन यांच्यासारखा लूक देण्यात आला आहे.

दिशाचा या गाण्यातील लूक हॉलिवूडचे डिझायनर एशले रेबेलो यांनी डिझाईन केलेला आहे. या गाण्यासाठी दिशाला त्यांनी 60 ते 70 च्या दशकातील अभिनेत्रींचा लूक द्याचा होता. त्यासाठी त्यांच्या डोक्यात अनेक अभिनेत्रींचा विचार आला होता. मात्र अखेर त्यांनी हेलेन यांच्या लूकवरून प्रेरणा घेत दिशासाठी लूक डिझाईन केला. त्यामुळेच या गाण्यातील तिचा लूक भडक असला तरी तो सेन्श्युअस व क्लासी आहे, असे एशेल रेबेलो यांनी सांगतिले. या गाण्यात दिशाने नेसलेली पिवळ्या रंगाची साडी देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे. त्यासाठी रेबेलो सुरुवातीला लाल की पिवळा या दोन रंगात गोंधळलेले होते. अखेर त्यांनी पिवळ्या रंगाला पसंती दिली.

भारत या चित्रपटात सलमान खान, कतरिना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ, दिशा पटानी, नोरा फतेही व सुनील ग्रोव्हर दिसणार आहेत.हा चित्रपट येत्या ईदला रिलीज होणार आहे.

Intro:Body:

ENT news 01

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.