मुंबई - अभिनेता इमरान हाश्मी लवकरच डिजीटल व्यासपीठावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बार्ड ऑफ ब्लड' असे त्याच्या पहिल्याच वेबसीरिजचे नाव आहे. या वेबसीरिजमध्ये तो गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा पहिला लुक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरिजमध्ये इमरानसोबत विनीत कुमार सिंग, शोभिता धुलीपाला, क्रिती कुल्हारी आणि रजीत कपूर हे कलाकार झळकणार आहेत.
दिग्दर्शक रिभू दासगुप्ता हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करत आहेत. तर, शाहरुख खानच्या रेड चिली अंतर्गत या वेबसीरिजची निर्मिती होत आहे. ही वेबसीरिज बिलाल सिद्दीकी यांच्या २०१५ मध्ये आलेल्या पुस्तकावर आधारित आहे.
-
I spy with my little eye a first look at @emraanhashmi in #BardOfBlood. Coming soon. pic.twitter.com/ifKFaj1iFe
— Netflix India (@NetflixIndia) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I spy with my little eye a first look at @emraanhashmi in #BardOfBlood. Coming soon. pic.twitter.com/ifKFaj1iFe
— Netflix India (@NetflixIndia) July 6, 2019I spy with my little eye a first look at @emraanhashmi in #BardOfBlood. Coming soon. pic.twitter.com/ifKFaj1iFe
— Netflix India (@NetflixIndia) July 6, 2019
या वेबसीरिजमध्ये भूमिका साकारण्यासाठी मी फार उत्सुक असल्याचे इमरानने म्हटले आहे. कथेला कोणत्याही सीमांची मर्यादा नसते. एक कलाकार म्हणून माझ्यासाठी ही भूमिका एक आव्हान होते. हे आव्हान स्विकारण्यासाठी मी तयार आहे, असेही तो म्हणाला.
२७ सप्टेंबर पासून या वेबसीरिजचे भार नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहेत. विशेष म्हणजे हिंदी, उर्दु आणि इंग्रजीसह इतरही भाषांमध्ये ही वेबसीरिज प्रसारित होणार आहे.
इमरान अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'चेहरे' चित्रपटातही भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा या चित्रपटातील लूक प्रदर्शित झाला होता.