मुंबई - अभिनेता आयुष्मान खुराना आणि वाणी कपूर यांनी मंगळवारी अभिषेक कपूर दिग्दर्शित 'चंदीगड करे आशिकी'चे संपूर्ण शूटिंग संपवले आहे. शूट रॅप सेलिब्रेशनमधील फोटोंसह निर्मात्यांनी चित्रपटाविषयीचे उपडेट शेअर करण्यासाठी ट्विटरची मदत घेतली आहे.
टी-सीरीज आणि गाय इन द स्काई पिक्चर्स प्रॉडक्शन यांची संयुक्त निर्मिती असलेला हा चित्रपट एक “पुरोगामी प्रेमकथा” आहे. ऑक्टोबरमध्ये कोरोना व्हायरस साथीच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले होते. टीमने ४८ दिवसांच्या सग शेड्यूलमध्ये शुटिंग पूर्ण केले आहे.
टीमचे कौतुक करीत निर्मात्यांनी इन्स्टाग्रामवर लिहिले की, “दिग्दर्शक अभिषेक कपूरचा 'चंडीगढ करे आशिकी' हा मुख्य प्रवाहातील भारतीय चित्रपटांपैकी एक बनला आहे. हा चित्रपट दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत साथीचा आजार असताना पूर्ण झाला आहे."
टी-सीरिज फिल्म्सने शेअर केलेल्या फोटोमध्ये आयुष्यमान खुराना, वाणी, अभिषेक आणि उर्वरित टीम स्थानिक चंदीगड येथील क्लबमध्ये केक कटिंग सोहळ्याच्या माध्यमातून शूट रॅप साजरा करताना दिसत आहेत.
या चित्रपटामध्ये आयुष्यमान खुराना क्रॉस-फंक्शनल एथलीटच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याची वाणी कपूर नायिका आहे.
हेही वाचा -सारा अली खानने 'कुली नंबर 1'मधील आकर्षक फोटो केले शेअर
चंदीगड करे आशिकीचे शूटिंग संपल्यानंतर काही दिवसात आयुष्मान नव्या चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात करणार आहे. अभिनेता आयुष्मान खुराना आगामी 'डॉक्टर जी' या चित्रपटात कारकिर्दीतील पहिलीच डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातून अनुभुती कश्यप बॉलिवूडमध्ये दिग्दर्शकिय पदार्पण करणार आहे. अनुभुती ही प्रसिध्द निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यपची धाकटी बहिण आहे.
हेही वाचा -रणबीरसोबत कधी लग्न करणार? आलिया भट्टने दिले उत्तर