ETV Bharat / sitara

ऐकलंत का? आयुष्मान खुराना साकारणार सीता, राधा अन् द्रोपदीची भूमिका - box office

कथा चांगली असेल, तर अल्प बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवू शकतात, हे आयुष्मानने सिद्ध केले आहे. आता 'ड्रिम गर्ल' या चित्रपटातून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ऐकलंत का? आयुष्मान खुराना साकारणार सीता, राधा अन् द्रोपदीची भूमिका
author img

By

Published : May 2, 2019, 6:26 PM IST

मुंबई - 'बधाई हो' आणि 'अंधाधून' या चित्रपटांना मिळालेल्या अफलातून यशानंतर आयुष्मान खुराना पुन्हा एकदा प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. कथा चांगली असेल, तर अल्प बजेट चित्रपटही बॉक्स ऑफिसवर दमदार यश मिळवू शकतात, हे आयुष्मानने सिद्ध केले आहे. आता 'ड्रिम गर्ल' या चित्रपटातून पुन्हा एकदा तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक राज शांडिल्य यांच्या 'ड्रिम गर्ल' चित्रपटात आयुष्मान चक्क स्त्रियांच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटात तो राधा, सीता आणि द्रोपदीच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. एका माध्यमाशी बोलताना दिग्दर्शक राज यांनी सांगितले होते, की 'या चित्रपटाच्या कथानकाबद्दल मी फार काही सांगू शकत नाही. मात्र, चित्रपटाच्या पोस्टरवरून चाहत्यांना कथेचा अंदाज लावता येऊ शकेल. या चित्रपटात आयुष्मान रामायणाची सीता, महाभारताची द्रोपदी आणि क्रिश्न लीलामधील राधेच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे'.

आयुष्माननेही एका माध्यमाच्या मुलाखतीत सांगितले होते, की ''ड्रिम गर्ल' ही एक युनिक कथा आहे. या चित्रपटात मला साडी घालायला मिळणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत खूप उत्साही आहे, असे तो म्हणाला होता.

या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरुचा आणि मनज्योत सिंग हे कलाकारही भूमिका साकारणार आहेत. 'ड्रिम गर्ल' हा चित्रपट दिग्दर्शक राज यांचा दिग्दर्शनात पदार्पणीय चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.