मुंबई - आयुष शर्मा याची भूमिका असलेल्या 'लास्ट .. द फाइनल ट्रुथ' चित्रपटातील सलमान खानचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेता आयुष शर्माने त्याचा सह-अभिनेता सलमान खानचा पहिला लूक प्रसिध्द केला असून याबद्दल त्याने सोशल मीडियावर लिहिले की, “अंतिम...ची झाली सुरूवात." असे लिहित त्याने भाईच्या फर्टलूकला हॅशटॅग केले आहे.
हा चित्रपट दोन मजबूत, सामर्थ्यशाली व्यक्तिरेखांविषयी आहे ज्याचे चित्रण आजवर भारतीय चित्रपटसृष्टीत यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे.
![Salman's first look](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9831008_salman.jpg)
हेही वाचा -आपण किती कफल्लक आहोत हे लॉकडाऊनमध्ये समजले - अनुपम खेर
जानेवारीच्या मध्यापर्यंत हा चित्रपट पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याने 'दबंग' अभिनेता सलमान त्याच्या वाढदिवसाची सुट्टी वगळता डिसेंबरमध्ये शूटिंग करणार आहे.
हेही वाचा -गेल्या आठ महिन्यांपासून काहीच काम मिळालेले नाही - मीका सिंह