मुंबई - जगप्रसिध्द गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या एका गाण्याच्या रिहर्सलचा व्हिडीओ सध्या चाहत्यांमध्ये आवडीने पाहिला जात आहे. येत्या १५ डिसेंबरला षण्मुखानंद सभागृहात त्यांच्या गाण्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात एस. डी. बर्मन, आर. डी. बर्मन, हेमंत कुमार आणि सलिल चौधरी यांच्या सुमधुर गीतांचे सादरीकरण होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
या शोसाठी मुंबईतील संगीतकारांसोबत आशा भोसले यांनी रिहर्सल केली. यावेळी त्यांनी 'दो लफ्झोंकी है... ' या गाण्याला स्वरसाज चढवला. त्यांच्या रिहर्सलचा हा व्हिडिओ आशा भोसले यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दुसऱ्या एका फोटोमध्ये संगीतात साथ देणाऱ्या सर्व वादक कलाकारांसोबतचा एक फोटोही शेअर केलाय. यात सर्वजण आशा भोसलेंसोबत आनंदात दिसत आहेत. यामध्ये अरविंद हळदीपूरकर, मनिष कुलकर्णी, बिश्वजीत रे, चिंटू भोसले, राहुल रानडे, अनमोल आरजे, ग्रेसियस डिकॉस्टा, आणि कमलेश भडकमकर दिसत आहेत.