ETV Bharat / sitara

'निशब्दम'मध्ये अनोख्या भूमिकेत झळकणार अनुष्का शेट्टी - निशब्दम हा चित्रपट हिंदीसह, तामिळ, तेलुगु

'निशब्दम' या चित्रपटातील अनुष्का शेट्टीचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. यात ती पेटींग करताना दिसतेय. निशब्दम हा चित्रपट हिंदीसह, तामिळ, तेलुगु, मळ्यालम आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे.

अनुष्का शेट्टी
author img

By

Published : Sep 11, 2019, 4:38 PM IST

मुंबई - अभिनेत्री अनुष्का शेट्टी आगामी 'निशब्दम' या चित्रपटात झळकणार आहे. आर. माधवनसोबत तिची जोडी असलेल्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिध्द झाला आहे. या चित्रपटात ती एका पेटींग कलाकाराची भूमिका साकारत आहे.

पोस्टरवर अनुष्का हातात ब्रश घेऊन नदी किनारी कॅनव्हासवर चित्र रेखटताना दिसत आहे. शहरालगतची नदी किनारी हिरवळीवर ती आपली कलाकृती बनवताना पोस्टरध्ये दिसत आहे. तिच्यासाठी हा चित्रपट खास असून २०१९ मध्ये ती अभिनयाच्या क्षेत्रात १४ वर्षे कार्यरत आहे.

'निशब्दम' चित्रपटाचे दिग्दर्शन हेमत मधुकर करीत आहेत. या चित्रपटात 'किल बिल' आणि 'रिसर्वायर डॉग' फेम मिशेल मॅडसन महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

या चित्रपटाचे अमेरिकेत वेगवेगळ्या लोकेशन्सवर शूटींग होणार आहे. या चित्रपटाची कथा अमेरिकेत घडत असल्याचे सूत्रांकडून समजते. निशब्दम हा चित्रपट हिंदीसह, तामिळ, तेलुगु, मळ्यालम आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित होईल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.