मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने वर्षातील काही 'खास, अनमोल क्षण' शोधून काढले आहेत. तिने पतीविराट कोहलीसोबत घालवलेल्या खास क्षणांचाही समावेश यात केलाय.
शुक्रवारी सकाळी अनुष्काने इन्स्टाग्रामवर तिच्या ४९ दशलक्ष फॉलोअर्ससाठी व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये अनुष्का आणि विराट आपल्या पाळीव प्राण्यांसोबत खेळताना आणि खायला देताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुष्काने लिहिलंय, "गेल्या वर्षाचे काही खास, अनमोल क्षण ❤️."
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनुष्काने आव्हानात्मक कोरोना साथीचे गेले वर्ष वैयक्तिकरित्या आणि व्यावसायिकदृष्ट्या उत्तम गाजवले. तिने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये तिच्या गरोदरपणाची बातमी जाहीर केली आणि यावर्षी जानेवारीत विराटसह तिच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. कामाच्या पातळीवर पाताल लोक ही तिची वेब सिरीज खूप चर्चेत राहिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - चार्ली चॅप्लिनच्या जन्मदिनी संदिप पाठकचे अनोखे फोटोशूट