मुंबई - सोशल मीडियावर सध्या बॉलिवूड कलाकार आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. आपले बालपणीचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करत असतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीच्या बालपणीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळतेय. आज ही अभिनेत्री बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसुन अनुष्का शर्मा आहे. अनुष्काने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. बालपणीदेखील ती खूपच क्युट असल्याचं या फोटोमध्ये पाहायला मिळते. तिच्या या फोटोवर विराटनेही कमेंट केली आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. दोघांचेही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. अलिकडेच दोघांचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिवाय, त्यांचा एका कार्यक्रमातील व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराट आणि अनुष्काने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. दोघांची जोडी चाहत्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे.
हेही वाचा-मुलाच्या वाढदिवशी काजोल-अजयची भावनिक पोस्ट
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं, तर अनुष्का 'झिरो' चित्रपटापासून कोणत्याही चित्रपटात झळकली नाही. मात्र, अलिकडेच तिने एका जाहिरातीत भूमिका साकारली आहे. या जाहिरातीत ती पोलिसाच्या भूमिकेत पाहायला मिळाली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा-आईला नेहमीच मुलगी हवी होती, ड्रीम गर्ल पाहून तिला नक्कीच आनंद होईल - अपारशक्ती