ETV Bharat / sitara

'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला - अनुराग कश्यपची प्रतिक्रिया

आपण ज्या सरकारवर विश्वास ठेवत आहोत त्यातील बरेच लोक हे खोटारडे आहेत. आपला अशिक्षितपणा लपवण्यासाठी ते अतिहुशारी दाखवत आहेत, या शब्दात अनुरागने सरकारवर निशाणा साधला आहे.

Anurag kashyap reaction on JNU Voilence, supports students protest in mumbai
'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला
author img

By

Published : Jan 7, 2020, 12:33 PM IST

मुंबई - सध्या जेएनयूमधील हल्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबईमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि संगीतकार विशाल दादलानी यांनीदेखील सहभाग घेतला होता. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेट वे ऑफ इंडिया' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली. तसेच, अनुरागने थेट सरकारवर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

अनुराग कश्यप

'आपण ज्या सरकारवर विश्वास ठेवत आहोत त्यातील बरेच लोक हे खोटारडे आहेत. आपला अशिक्षितपणा लपवण्यासाठी ते अतिहुशारी दाखवत आहेत. हे सरकार वरपासून खालपर्यंत खोटारडं आहे. जेव्हा सरकार तोंड उघडतं, तेव्हा ते खोटं बोलते', अशी तीव्र प्रतिक्रिया अनुरागने यावेळी दिली.
जेएनयूमधील हल्लेखोर हे सरकारचेच लोक असल्याचेही त्याने म्हटले आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळे नियम लागू करत आहे. त्यांनी पोलिसांनाही आपल्या ताब्यात ठेवले आहे, असेही अनुराग यावेळी म्हणाला.

हेही वाचा-जेएनयू हिंसाचार : या घटनेमुळे मला मोठा धक्का बसला, अनिल कपूर यांची प्रतिक्रिया

जेएनयूमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आणि स्टुडंट प्रेसिडेंट आयेशी घोष ही सुध्दा गंभीर जखमी झाली आहे. तिच्या डोळ्याच्या वर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

हेही वाचा-जेएनयू हिंसाचार : देशात विद्यार्थ्यांपेक्षा गायींना जास्त सुरक्षा, ट्विंकल खन्नाची तीव्र प्रतिक्रिया

Intro:Body:

'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला

मुंबई - सध्या जेएनयूमधील हल्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त केला जात आहे. मुंबईमध्येही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनात  दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि संगीतकार विशाल दादलानी यांनीदेखील सहभाग घेतला होता. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेटवे' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली. तसेच, अनुरागने थेट सरकारवर निशाणा साधत आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

'आपण ज्या सरकारवर विश्वास ठेवत आहोत त्यातील बरेच लोक हे खोटारडे आहेत. आपला अशिक्षितपणा लपवण्यासाठी ते अतीहुशारपणा दाखवत आहेत. हे सरकार वरपासून खालपर्यंत खोटारडं आहे. जेव्हाही सरकार तोंड उघडतं, तेव्हा ते खोटं बोलते', अशी तीव्र प्रतिक्रिया अनुरागने यावेळी दिली. 

जेएनयूमधील हल्लेखोर हे सरकारचेच लोक असल्याचेही त्याने म्हटले आहे. सरकार वेगवेगळ्या विद्यापीठात वेगवेगळे नियम लागू करत आहे. त्यांनी पोलिसांनाही आपल्या ताब्यात घेतले आहे, असेही अनुराग यावेळी म्हणाला. 

जेएनयूमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जेएनयूच्या विद्यार्थी नेत्या आणि स्टुडंट प्रेसिडन्ट आयेशी घोष हिलाही गंभीर जखम झाली आहे. तिच्या डोळ्याच्या वर रॉडने हल्ला करण्यात आला होता. या भ्याड हल्ल्याचा सर्वच स्तरातून विरोध होत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.