मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात दिसलेला चेहरा म्हणजे अभिनेता आरोह वेलणकर, रोहने यंदा दिवाळी पाडव्याचे निमित्त साधून अतिशय पारंपारिक पद्धतीने दिवाळी पाडवा साजरा केला.
आरोह हा मूळचा पुण्याचा असला तरीही कामामुळे आता मुंबईकर झालेला आहे. त्याने आणि पत्नी अंकिता यांनी दिवाळीनिमित्त घराची सुंदर सजावट केली आहे. आज दिवाळी पडव्याच निमित्त साधून त्यांनी अत्यंत साधेपणाने पणत्यांची सजावट तयार केलीय. त्यानंतर अंकिताने आरोहला छान ओवाळल, त्यानेही तिला छान गिफ्ट दिलं.

दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा अस आपण नेहमीच म्हणत असतो पण या जोडप्यासाठी हा सण खरंच खूप खास आहे अंकिताने दिवाळीनिमित्त खास फराळही तयार केला असून ओवाळणी झाल्यावर या फराळावर ताव मारत दिवाळ सण साजरा करणार असल्याचा आरोहन त्याच्या फॅन्सना सांगितल आहे. याशिवाय आपल्या फॅन्सना त्याने दिवाळीच्या खास शुभेच्छाही देऊ केल्या आहेत.