मुंबई - ९०च्या दशकात महेश भट्ट दिग्दर्शित 'सडक' चित्रपट सुपरहिट ठरला होता. संजय दत्त आणि पूजा भट्ट यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. आता या चित्रपटाचा सिक्वेल तयार करण्यात येणार आहे. मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यातच महेश भट्ट यांनी 'सडक-२'च्या सिक्वेलची घोषणा केली होती. या चित्रपटात आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर मुख्य भूमिका साकारणार आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
'सडक-२' च्या सिक्वेलमध्ये संजय दत्त आणि पूजा भट्ट यांची जोडीदेखील पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर झळकणार आहे. एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, या चित्रपटात 'सडक' चित्रपटातील 'तुम्हे अपना बनाने की कसम खाई है' या गाण्याचे रिमेक पुन्हा एकदा 'सडक-२' मध्ये तयार करण्यात येणार आहे. 'सडक' चित्रपटात हे गाणे अनुराधा पौंडवाल आणि कुमार सानू यांनी गायले होते.
'तुम्हे अपना बनाने की कसम' या गाण्याचे रिप्राईझ व्हर्जन यापूर्वीही तयार करण्यात आले आहे. झरीन खान आणि शरमन जोशी यांच्या 'हेट स्टोरी -३' या चित्रपटात हे गाणे पाहायला मिळाले होते.
'सडक-२' च्या माध्यमातून आलिया भट्ट पहिल्यांदाच वडिलांच्या म्हणजे महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनाखाली भूमिका साकारणार आहे. यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.