मुंबई - आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा न्यूयॉर्कमधील एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत बॉलिवूडची ही कथित जोडी वाढदिवस साजरा करताना दिसत आहे.
व्हायरल फोटोमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यासह रणबीर आलियाचे चुंबन घेताना दिसत आहे.
हा फोटो रणबीर, आलिया, अर्जुन किंवा मलायका या चौघांपैकी कोणीही सोशल मीडियावर शेअर केलेला नाही.
न्यूज रिपोर्टनुसार हा फोटो जुना असून आलियाची दोस्त नताशा पुनावालाने आलियाच्या २७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेअर केला होता. हा फोटो न्यूयॉर्कमधील असल्याचे सांगण्यात येते.
नाताशाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, 'बर्थडे गर्ल.. हैप्पी हैप्पी बर्थडे आलिया'
मीडिया रिपोर्टनुसार हा फोटो जुना आहे. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू असताना आलिया आणि रणबीर सुट्टीसाठी गेले होते.
असो, तर आलिया भट्टने बहिण शाहिन भट्ट आणि आकांक्षा रंजन कपूर आणि मेघना गोयल यांच्यासोबत या वेळचा वाढदिवस साधेपणाने साजरा केला.
मेघनाच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. चाहत्यांनी त्यावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आलिया आणि रणबीर कपूर लवकरच अयान मुखर्जी यांच्या ब्रम्हास्त्र चित्रपटात झळकणार आहेत. यात अमिताभ बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट तीन भागात बनत आहे. आतापर्यंत या चित्रपटाचा लोगो रिलीज करण्यात आलाय.करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेला 'ब्रम्हास्त्र' हा चित्रपट ४ डिसेंबर २०२० ला रिलीज होणार आहे