मुबंई - खिलाडी 'अक्षय कुमार'चा 'मिशन मंगल' हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या पर्वावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीजर अलिकडेच प्रदर्शित झाला. या टीजरमध्ये चित्रपटातील सर्व कलाकारांची झलक पाहायला मिळाली. आता अक्षय कुमारने या चित्रपटाचे आणखी एक नवं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
अक्षयने हे पोस्टर शेअर करुन ट्रेलरची तारीखही जाहिर केली आहे. येत्या १८ जुलैला या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. नव्या पोस्टरमध्ये सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, शरमन जोशी, नित्या मेनन, क्रिती कुल्हारी आणि अक्षय कुमारची झलक पाहायला मिळते.
-
Ek kahaani, jisne Indian space science ki paribhasha hi badal di! Get ready for the #MissionMangal Trailer, coming on 18th July.@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions pic.twitter.com/2JAiO8dwUH
— Akshay Kumar (@akshaykumar) July 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Ek kahaani, jisne Indian space science ki paribhasha hi badal di! Get ready for the #MissionMangal Trailer, coming on 18th July.@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions pic.twitter.com/2JAiO8dwUH
— Akshay Kumar (@akshaykumar) July 16, 2019Ek kahaani, jisne Indian space science ki paribhasha hi badal di! Get ready for the #MissionMangal Trailer, coming on 18th July.@taapsee @SonakshiSinha @vidya_balan @TheSharmanJoshi @menennithya@IamKirtiKulhari @Jaganshakti @foxstarhindi #CapeOfGoodFilms #HopeProductions pic.twitter.com/2JAiO8dwUH
— Akshay Kumar (@akshaykumar) July 16, 2019
'एक कहानी जिसने इंडियन स्पेस सायन्सची परिभाषा बदल दी, 'मिशन मंगल'साठी सज्ज', असे कॅप्शन अक्षयने या पोस्टरवर दिले आहे. अक्षय कुमार या चित्रपटा वैज्ञानिक राकेश धवन यांच्या भूमिकेत दिसणार आहे. राकेश धवन आणि तारा शिंदे यांनी अनेक आव्हान स्विकारत 'मंगळयान' मिशन पूर्ण केले होते. भारताचे
पहिला उपग्रह मंगळवार पाठवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले होते. हाच थरार आता 'मिशन मंगल' चित्रपटात अनुभवायला मिळणार आहे. दिग्दर्शक जगन शक्ती यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, पॅडमॅन चित्रपटाचे निर्माते 'आर बाल्की' यांनीच या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
१५ ऑग्सट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासोबतच प्रभासचा 'साहो' आणि जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी शर्यत पाहायला मिळेल.