मुंबई - सुप्रसिद्ध दिग्दर्शक आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, सारा अली खान आणि दाक्षिणात्य अभिनेता धनुष यांची वर्णी लागली आहे. 'अतरंगी रे' असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. या तिघांचे फर्स्ट लुकदेखील प्रदर्शित करण्यात आले आहेत.

या चित्रपटाच्या निमित्ताने सारा अली खान अक्षय कुमार आणि धनुष हे पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. एका माध्यमाशी बोलताना अक्षयने सांगितले, की या चित्रपटाची कथा त्याला इतकी आवडली की त्याने अवघ्या १० मिनिटांमध्येच या चित्रपटासाठी होकार कळवला होता. या चित्रपटातील भूमिका आव्हानात्मक असल्याचेही त्याने सांगितले. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच माझे पात्र असल्यामुळे या चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचेही त्याने सांगितले.


हेही वाचा -Man Vs Wild मध्ये रजनीकांत पाठोपाठ अक्षय कुमारचीही एन्ट्री
या चित्रपटाला ए. आर. रेहमान यांचे संगीत लाभणार आहे. तर, हिमांशू शर्मा यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. भूषण कुमार यांच्या टी सीरिजअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. मार्च महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल.
-
#AkshayKumar, #Dhanush and #SaraAliKhan... Aanand L Rai's new film #AtrangiRe will release on #ValentineDay2021... Music by AR Rahman... Written by Himanshu Sharma... Presented by TSeries, Colour Yellow Productions and Cape Of Good Films. pic.twitter.com/SAfeb1ZAY1
— taran adarsh (@taran_adarsh) January 30, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#AkshayKumar, #Dhanush and #SaraAliKhan... Aanand L Rai's new film #AtrangiRe will release on #ValentineDay2021... Music by AR Rahman... Written by Himanshu Sharma... Presented by TSeries, Colour Yellow Productions and Cape Of Good Films. pic.twitter.com/SAfeb1ZAY1
— taran adarsh (@taran_adarsh) January 30, 2020#AkshayKumar, #Dhanush and #SaraAliKhan... Aanand L Rai's new film #AtrangiRe will release on #ValentineDay2021... Music by AR Rahman... Written by Himanshu Sharma... Presented by TSeries, Colour Yellow Productions and Cape Of Good Films. pic.twitter.com/SAfeb1ZAY1
— taran adarsh (@taran_adarsh) January 30, 2020
हेही वाचा -'लव्ह आज कल २' चं नवं गाणं, पाहा सारा-कार्तिकचा धमाल डान्स