ETV Bharat / sitara

सुनैनानंतर आता तिचा बॉयफ्रेन्ड आला समोर, रोशन कुटुंबावर केले 'हे' आरोप - allegations

सुनैनाने सांगितले होते, की तिचा बॉयफ्रेन्ड मुस्लीम असल्यामुळे तिला राकेश रोशन यांनी मारहाण केली. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर कंगनाची बहीण रंगोलीनेही काही खुलासे केले होते.

सुनैनानंतर आता तिच्या बॉयफ्रेन्ड आला समोर, रोशन कुटुंबावर केले 'हे' आरोप
author img

By

Published : Jun 25, 2019, 9:59 AM IST

मुंबई - काही दिवसांपासून हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन हिची फार चर्चा सुरू आहे. आपला बॉयफ्रेन्ड मुस्लीम असल्यामुळे वडिलांनी आपल्याला मारहाण केली, असा खुलासा सुनैनाने अलिकडेच केला आहे. या प्रकरणाची कंगनाची बहीण रंगोलीच्या ट्विटमुळेही चर्चा झाली. आता सुनैनाचा बॉयफ्रेन्ड रुहेल आमीन हा देखील समोर आला आहे. त्यानेही रोशन कुटुंबावर काही आरोप केले आहेत.

एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, रुहेलने म्हटलेय, की 'एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मावरुन दहशतवादी ठरवणं हे चुकीचं आहे. सुनैनाचे आई वडील राकेश रोशन आणि पिंकी रोशन हे आमच्या नात्यामुळे आनंदी नव्हते. जेव्हा सुनैनाने ही गोष्ट मला सांगितली, तेव्हा माझ्यासाठी हे अविश्वसनीय होते'.

सुनैनाने सांगितले होते, की तिचा बॉयफ्रेन्ड मुस्लीम असल्यामुळे तिला राकेश रोशन यांनी मारहाण केली. तिच्या ट्विटमुळे सोशल मीडियावर कंगनाची बहीण रंगोलीनेही काही खुलासे केले होते.

आता या प्रकरणाला आणखी कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.