मुंबई - 'बाहुबली' स्टार प्रभास पुन्हा एकदा सिनेसृष्टीत इतिहास रचणार आहे. 'बाहुबली' या चित्रपटाने जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास आता त्याच्या मेगा-बजेट चित्रपट 'आदिपुरुष'मुळे चर्चेत आला आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट जगभरात 20 हजारांहून अधिक स्क्रीन्स आणि 15 भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चित्रपटाचे मेकिंग बजेटही 400 कोटींवर पोहोचले आहे. असे झाल्यास 'आदिपुरुष' हा भारतीय चित्रपटसृष्टीतील अशा प्रकारचा पहिला चित्रपट ठरेल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेता प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेनॉन आणि सनी सिंग स्टारर 'आदिपुरुष' हा चित्रपट नवीन रेकॉर्ड बनवणार आहे. भारतीय भाषा आणि इंग्रजी व्यतिरिक्त हा चित्रपट जगभरात इंडोनेशिया, श्रीलंका, जपान आणि चीनमध्ये विविध भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरू आहे. 'आदिपुरुष' हा चित्रपट 20 हजारांहून अधिक स्क्रीनवर दाखवला जाणार आहे. अशा परिस्थितीत चित्रपटाचे मेकिंग बजेट 400 कोटींवर पोहोचले आहे.
ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष हा चित्रपट यावर्षी ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रभास भगवान 'राम'च्या भूमिकेत, क्रिती सेनॉन 'सीता'च्या भूमिकेत, सनी सिंग 'लक्ष्मण'च्या भूमिकेत आणि सैफ अली खान 'रावण'च्या भूमिकेत दिसणार आहे.
ओम राऊत यांनी याआधी अजय देवगण आणि सैफ अली खानसोबत 'तान्हाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'तान्हाजी' हा चित्रपट 2020 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
हेही वाचा - सैफ अलीने सांगितल्या 'आदिपुरुष'मधील 'रावणा'च्या भूमिकेबद्दलच्या रंजक गोष्टी