ETV Bharat / sitara

Vaishali Made Facebook Post : माझ्या जीवाला धोका...; वैशाली भैसने-माडेची फेसबुक पोस्ट चर्चेत - उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसने माडे हिची फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. 'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय', असा धक्कादायक खुलासा ( Vaishali Made Facebook Post ) वैशालीने केला आहे.

वैशाली भैसने-माडे
वैशाली भैसने-माडे
author img

By

Published : Feb 18, 2022, 3:04 PM IST

मुंबई - प्रसिद्ध मराठी गायिका वैशाली भैसने माडे हिने तिच्या जीवाला धोका असल्याची पोस्ट शेअर केल्याने सगळीकडे एकच खळबड उडाली आहे. मराठमोळ्या गायिकेची पोस्ट वाचताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मराठमोळी गायिका वैशाली भैसने-माडे हिने फेसबुक पोस्ट शेअर करत तिच्या जीवाला धोका असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. 'काही लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या हत्येचा कट रचला जातोय', असा धक्कादायक खुलासा वैशालीने केला आहे.

vaishali bhaisne made
वैशाली भैसने-माडे फेसबुक पोस्ट
या फेसबुक पोस्टवर तिने 2 दिवसांनी पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट करणार असल्याचेही लिहीले आहे. वैशालीच्या पोस्टनंतर वेगवेगळे तर्क-वितर्क लावायला सुरूवात झाली आहे. तर अनेक चाहत्यांनी कमेंट करत वैशालीला सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे. 'सारेगमप'च्या मंचावरून आपल्या करिअरची सुरूवात केल्यानंतर वैशालीने 'पिंगा ग पोरी पिंगा', कलंक चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' ही गाणी गायली आहेत. काही महिन्यांपूर्वी वैशालीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

हेही वाचा - Actor Kottayam Pradeep Died : मल्याळम अभिनेता कोट्टायम प्रदीप यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.