मुंबई - सनी लिओनी ही पॉर्न फिल्म्स केल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाली. पूजा भट च्या ‘जिस्म २’ आणि एकता कपूर च्या ‘रागिणी एमएमएस २’ मधून तिला प्रसिद्धी मिळाली. सुरुवातीला ‘सनी लिओनी हे काय प्रकरण आहे?’ या कुतूहलापोटी तिचे चित्रपट पाहिले गेल्यामुळे तिच्या चित्रपटांनी चांगला धंदा केला. तिला बॉलिवूडमध्ये सेलेब्रिटीपद सुद्धा मिळाले. तिथे तिचा जम बसल्यावर तिने प्रादेशिक चित्रपटांत शिरकाव केला आणि काही वर्षांपूर्वी एका मराठी चित्रपटात लावणी सुद्धा सादर केली. ‘बॉईझ’ या मराठी चित्रपटात सनी विचारत होती, ‘कुठं कुठं जायाचं हनिमूनला?’
सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री सनी लियोनीने बॉलीवूड मध्ये आपले स्थान निर्माण केल्यानंतर तिने प्रादेशिक सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड दर्शकाना उत्कृष्ट अदा दाखवल्यानंतर सनी मराठीमध्ये दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. यापूर्वी सनीने बॉईज या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली होती. लवकरच सनी लियोनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. आगामी आमदार निवास या चित्रपटाच्या निमित्ताने सनी आपल्याला आधुनिक शांताबाई रूपाने भेटणार आहे. या मराठी आयटम साँगची बॉलीवुड ने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत.
सनी लिओनी आता पुन्हा एका मराठी चित्रपटाचा भाग झाली आहे. 'आमदार निवास' या चित्रपटातील, 'शांताबाई' या गाण्याच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही वर्षांपूर्वी सुमीत म्युझिक ने प्रदर्शित केलेल्या ‘शांताबाई’ या गाण्याने कहर केला होता. या गाण्याला सव्वा कोटींच्या आसपास व्ह्यूज मिळालेले आहेत. आता तेच गाणे सनी लिओनी वर चित्रित करण्यात आले असून मराठी प्रेक्षकांसाठी ही पर्वणी असेल. सत्य घटनेवर प्रेरित असून सामाजिक दृष्टया दुर्लक्षित अशा विषयावर 'आमदार निवास' भाष्य करतो. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट ‘आमदार निवास’ लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज होणार आहे.
२०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ अलदिला होता. सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणे आता जय जगदंब प्रॉडक्शनने घेतले असून महाराष्ट्राची आधुनिक 'शांताबाई' म्हणून सनी लियोनी दिसणार आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. तर संजय लोंढे यांचं मूळ गीत असलेलं हे गाणं नितीन सावंत यांनी पुर्ननिर्मित करून या गाण्याला आधुनिकतेची झालर घातली आहे. 'शांताबाई' या गाण्याची भव्यता आणि गावरान बाज असलेल्या 'सनी लिओनी' च्या दिलखेच अदांनी प्रेक्षकांचा काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही तर या शांताबाई या गाण्याच्या निमित्ताने गायक संजय लोंढे याना एक मोठी संधी संजीवकुमार राठोड यांनी दिली आहे.
‘आमदार निवास' या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते संजीवकुमार राठोड असून सह निर्मात्या शालिनी राठोड आहेत. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा - ‘जलसा’ अभिनेत्री विद्या बालन आणि शेफाली शहा यांची खास मुलाखत