कुल्लू - बॉलीवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आजकाल हिमाचल प्रदेशमधील बडागडमध्ये सफरचंदाच्या बगीचामध्ये फिरताना दिसत आहे. ए फॉर अॅपल, बी फॉर मोठा अॅपल आणि सी फॉर छोटा अॅपल म्हणताना शिल्पा शेट्टी व्हिडिओत दिसत आहे.
कुल्लुमध्ये बॉलिवुडचे कलाकार चित्रपटाच्या शुटींगसाठी येत आहेत. याचवेळी इतर राज्यातील पर्यटकही येथे येत आहेत. तसेच शिल्पा शेट्टी ही या ठिकाणी उपस्थित असल्याने येथील साहसी पर्यटन आणि सफरचंदाचे बागांमधील रोमांच वाढत आहे.
बॉलीवुड फिल्म हंगामा 2 च्या शूटिंगसाठी शिल्पा शेट्टी, परेश रावल सहित अन्य कलाकार घाटीमध्ये पोहोचले आहेत. या दरम्यान शिल्पा शेट्टी फिल्मची शूटिंग सोडून आपला वेळ सफरचंदाच्या बागेत घालवत आहे. तसेच हे सर्व क्षण तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंडवरुन शेअर केले आहेत.
शिल्पाने लिहिले आहे की 'अॅपल-अॅपल एव्हरीव्हेअर अॅपल'. तिने पुढे लिहिले आहे, की ही खुपच सुंदर जागा आहे. येथे चारी बाजुंनी सफरचंदच सफरचंद आहेत. 'मी सफरचंद तोडून खाण्याच आनंद घेत आहे' आणि सफरचंद आरोग्यासाठी लाभदायक आहे.