हल्ली कलाकार भूमिकेसाठी वजन कमी जास्त करीत असतात. आता मराठी कलाकारही यात मोडू लागले आहेत. अभिनेत्री प्रीतम कागणे ‘विजेता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. ती या सिनेमात सुनंदा गुजर नामक ऍथलिट रनरची भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे प्रीतमने या भूमिकेसाठी तब्बल ६ किलो वजन कमी केलं होतं. खेळाडूची भूमिका नीटसपणे साकारण्यासाठी प्रीतमने वजन कमी केले होते.
एक मॅरेथॉन रनर घडविण्यासाठी तब्बल आठ वर्षाचा कालावधी लागतो मात्र प्रीतमला हा आठ वर्षाचा कालावधी अवघ्या दोन महिन्यात ट्रेनिंग घेऊन पूर्ण केला. दररोज तीन तास नॅशनल ऍथलिट यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन तो सराव तिने जिद्दीने पूर्ण केला. दररोज १८ किमी धावून विविध खेळाडूंचे व्हिडीओ युट्युबवर पाहून हवा तसा आहार तिने घेतला. योग्य तो आहार घेऊन प्रीतमने तब्बल सहा किलो वजन कमी केले.

सांगली जवळील वठार या छोट्याश्या गावात लहानाची मोठी झालेली अशी ही सुनंदा आहे. लहानपणापासून नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न उराशी बाळगून तिने पुढचा पल्ला गाठला. गावखेड्यात हव्या त्या सोयी उपलब्ध नसल्याने आपले स्वप्न कसे पूर्ण होईल यासाठी ती सतत झटत राहते. मात्र या प्रवासादरम्यान तिला साथ मिळाली ती माईंड कोचची. या चित्रपटात माईंड कोचच्या भूमिकेत सुबोध भावे दिसणार आहेत. सुनंदाला नॅशनल लेव्हलचे धडे देऊन ते स्पर्धेसाठी तयार करतात.

चित्रपटात प्रीतमसोबत अभिनेत्री पूजा सावंत देखील दिसणार आहे. तिच्यासोबतचे बऱ्याच धावण्याच्या स्पर्धेचे काही सीन पाहायला मिळणार आहेत. याबद्दल बोलताना प्रीतम असे म्हणाली की, “मी ‘विजेता’ सिनेमासाठी ६ किलो वजन कमी केले, या चित्रपटात मी साकारत असलेल्या रनर ऍथलिटच्या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीचे चीज झाले. मी केलेली मेहनत या चित्रपटातून नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. या चित्रपटात मैत्रीच्या आधारासह बरेच काही अनुभवता येणार आहे.”
हेही वाचा - कन्फर्म!! अखेर कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी घेतले 'सात फेरे'!!