मुंबई - टीव्ही मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री काम्या पंजाबी आणि तिचा प्रियकर शलभ डांग यांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. गुरुद्वारा येथे त्यांनी आपल्या भावी आयुष्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काम्या पंजाबी आणि शलभ डांग यांच्या साखरपुड्यादरम्यान त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. यावेळी शलभ निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसला. तर काम्यानं गोल्डन ब्लॅक शरारा आणि दुपट्टा परिधान केला होता. ९ फेब्रुवारीला त्यांच्या प्री वेडिंग सेरेमनीला सुरुवात होणार आहे.


यामध्ये हळदी, मेंहदी आणि संगीत यांसारखे सोहळ्यांचं आयोजन करण्यात आले आहे. १० फेब्रुवारीला त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. यानंतर ११ फेब्रुवारीला त्यांचा रिसेप्शन सोहळ्याच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दिल्ली येथेही ते रिसेप्शन पार्टी देणार आहेत.


काम्याने एक खास व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या साखपुड्याची झलक पाहायला मिळायला मिळते.

- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काम्या आणि शलभ मागच्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. शलभ हा दिल्ली येथील हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये काम करतो.


काम्याचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिने उद्योगपती असलेल्या बंटी नेगीसोबत लग्न केले होते. मात्र, १० वर्षाच्या नात्यानंतर २०१३ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. काम्याला एक मुलगी देखील आहे.