मुंबई - अभिनेता स्वप्निल जोशी यांच्याकडे आज संध्याकाळी दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच आगमन झालं. अतिशय साधेपणाने गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत त्याने बाप्पाची मूर्ती घरात आणली.
स्वप्निलच्या घरी गेल्या काही वर्षांपासून चांदीची गणरायाची मूर्ती स्थापित केली जाते. दीड दिवसाने घरातच त्या मूर्तीच विसर्जन केलं जातं. एरवी त्याच्या घरी गणपतीमध्ये नातेवाईक आणि मित्र मंडळींचा राबता असला तरीही सध्या मात्र घरात राघव आणि मायरा ही लहान मुलं आणि आई बाबा हे वृद्ध मंडळी असल्याने त्याने मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
दुसरीकडे ख्यातनाम कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्याकडेदेखील गणपती बाप्पाचं आगमन झाले आहे. उमेश जाधव यांच्याघरी दरवर्षी गणपतीमध्ये उत्सवी वातावरण असतं. आगमन आणि विसर्जन आशा दोन्ही वेळी बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. याशिवाय दरवर्षी त्यांच्या डान्स ग्रुपमधील मुलं आवर्जून सकाळ संध्याकाळ त्यांच्याघरी तासभर तरी बाप्पाची आरती करायला असतात. मात्र यंदा या साऱ्या गोष्टीना फाटा देत अत्यंत साधेपणाने त्यांच्या घरी पुढील 10 दिवस गणपती बाप्पाची सेवा केली जाणार आहे.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सेलिब्रिटीनी बाप्पाची पूजा आणि स्थापना साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे एकमेकांच्या घरी जाण्यात देखील अडचणी असल्याने बहुतेकांनी मित्रमंडळी, पाहुणे रावळे, माध्यम प्रतिनिधी याना लांबच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी व्हिडीओ, फेसबुक, व्हिडीओ कॉल या माध्यमातूच बाप्पाचं दर्शन घेण्याला आणि देण्याला प्राधान्य आहे. त्यामुळे कोरोना नंतरच्या जगात मराठी उत्सवांच बदललेलं स्वरूप यंदा आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.