ETV Bharat / sitara

'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक

१९६५ ते १९७३ या काळात जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी जवळपास २८ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

Actor Arvind Swami Share tease look as MGR in Thalaivi
'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक
author img

By

Published : Jan 17, 2020, 5:05 PM IST

मुंबई - तमिळ सुपरस्टार आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या १०२ व्या जयंती निमित्त शुक्रवारी (१७ जानेवारी) 'थलायवी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेता अरविंद स्वामी यांचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे. अरविंद हे एमजीआर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'थलायवी' हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनपटावर आधारित आहे. जयललिता यांच्या आयुष्यात एमजीआर यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.

अभिनेता अरविंद स्वामीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटातील दोन लुक शेअर केले आहेत. यामध्ये त्यांचा लुक हुबेहुब एमजीआर यांच्याप्रमाणे असल्याचे दिसून येते.

हेही वाचा -सारा-कार्तिकच्या 'लव्ह आज कल'चा ट्रेलर प्रदर्शित, चाहते मात्र संभ्रमात

१९६५ ते १९७३ या काळात जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी जवळपास २८ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी एकत्रित साकारलेला चित्रपट होता 'आयराथिल ओरुवन'. हा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाला होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अभिनेत्री कंगना रणावत या चित्रपटात जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २६ जून रोजी हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -'मन फकीरा' १४ फेब्रुवारीला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Intro:Body:

'थलायवी': एमजीआर यांच्या भूमिकेतील अरविंद स्वामींची पहिली झलक

मुंबई - तमिळ सुपरस्टार आणि तमिळनाडुचे माजी मुख्यमंत्री एमजी रामचंद्रन यांच्या १०२ व्या जयंती निमित्त शुक्रवारी (१७ जानेवारी) 'थलायवी' चित्रपटाच्या निर्मात्यांनी अभिनेता अरविंद स्वामी यांचा पहिला लुक प्रदर्शित केला आहे. अरविंद हे एमजीआर यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'थलायवी' हा चित्रपट तमिळनाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनपटावर आधारित आहे. जयललिता यांच्या आयुष्यात एमजीआर यांचीही महत्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे.

अभिनेता अरविंद स्वामीने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या चित्रपटातील दोन लुक शेअर केले आहेत. यामध्ये त्यांचा लुक हुबेहुब एमजीआर यांच्याप्रमाणे असल्याचे दिसून येते.

१९६५ ते १९७३ या काळात जयललिता यांच्यासोबत एमजीआर यांनी जवळपास २८ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी एकत्रित साकारलेला चित्रपट होता 'आयराथिल ओरुवन'. हा चित्रपट १९६५ साली प्रदर्शित झाला होता.

अभिनेत्री कंगना रनौत या चित्रपटात जयललिता यांच्या भूमिकेत झळकणार आहे. मागच्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली. या चित्रपटाचा टीझरही काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट ३ भाषांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. २६ जून रोजी हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.