मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांची नात आणि अभिषेक आणि ऐश्वर्या यांची मुलगी आराध्या हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात आराध्याने दमदार भाषण दिले आहे. तिच्या भाषणाचा एक छोटा व्हिडिओ अमिताभ बच्चन यांनीदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.
एरवी नेहमीच ऐश्वर्याच्या हातात हात असलेल्या आराध्यावर नेटकऱ्यांचा निशाणा असतो. मात्र, तिचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्या आवाजाची आणि सादरीकरणाची प्रशंसा केली आहे. आपल्या भाषणामध्ये तिने महिला सबलीकरणाचा मुद्दा अधोरेखित करत, एक भाषण सादर केलं.
-
the proudest moment and voice .. of the girl child .. of Aaradhya , my own .. https://t.co/Gsa9gBIgBA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">the proudest moment and voice .. of the girl child .. of Aaradhya , my own .. https://t.co/Gsa9gBIgBA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019the proudest moment and voice .. of the girl child .. of Aaradhya , my own .. https://t.co/Gsa9gBIgBA
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 22, 2019
हेही वाचा -भांडणानंतर पहिल्यांदा एकत्र आले कपिल आणि सुनील, पाहा फोटो
या भाषणामध्ये आराध्याने म्हटलं, की 'मी कन्या आहे. मी स्वप्न आहे. मी एका नव्या युगाचं स्वप्न आहे. मला अशा जगाची प्रतिक्षा आहे, जिथे मी सुरक्षित राहू शकेन. माझ्या आदरासोबत माझ्यावर प्रेम केलं जाईल. मला अशा जगाची प्रतीक्षा आहे, जिथे माझा आवाज दाबला जाणार नाही, तर मला समजून घेतले जाईल. मला असं जग हवंय, जिथे मला आयुष्याच्या पुस्तकातून ज्ञान मिळेल'.
आराध्याच्या संवादकौशल्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अमिताभ बच्चन यांनी देखील आपल्या नातीचं कौतुक करून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
-
.. the pride of the family .. the pride of a girl .. the pride of all women ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
OUR dearest AARADHYA .. https://t.co/jQ9FFrmBEZ
">.. the pride of the family .. the pride of a girl .. the pride of all women ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2019
OUR dearest AARADHYA .. https://t.co/jQ9FFrmBEZ.. the pride of the family .. the pride of a girl .. the pride of all women ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 20, 2019
OUR dearest AARADHYA .. https://t.co/jQ9FFrmBEZ
हेही वाचा -इंडियन आयडॉलच्या सेटवर नेहाने एक्स बॉयफ्रेंडसाठी गायलं गाणं, पाहा व्हिडिओ