मुंबई - बॉलिवूडचे दोन टोकं असलेले दिग्दर्शक म्हणजे अनुराग कश्यप आणि विक्रम आदित्य मोटवानी. दोघांनी 'उडान', 'ट्रेन्ड', 'भावेश जोशी : सुपरहिरो' आणि नेटफ्लिक्सची सुपरडुपरहिट हिंदी वेबसीरिज 'सेक्रेड गेम्स' यांसारख्या प्रोजेक्ट्सवर एकत्र काम केले आहे. मात्र, असे काय झाले की आदित्य मोटवानी आता अनुराग कश्यपला आपला सर्वात मोठा शत्रु मानत आहे.
खरंतर दोघेही दिग्दर्शक आपल्या कामाप्रती अतिशय काटेकोर आहेत. आपल्या कामाप्रती पझेसिव्ह देखील आहेत. दोघेही एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. विक्रमने सांगितले, की 'आम्ही शत्रुंमध्ये खुप कट्टर शत्रु आहोत. तो माझ्या सेटवर येत नाही. किंवा, मी त्याच्या सेटवर जात नाही. आम्ही भेटीगाठीच्या बाबतीत खूप मजा करतो. पण, एकमेकांच्या सेटवर जात नाही. ही आमच्यातील एक बॉन्डिंग आहे.
यामागचं कारण 'सेक्रेड गेम्स' सांगितले जाते. या सीरिजच्या पहिल्या पर्वात आदित्य हा दिग्दर्शक आणि शॉ रनर होता. मात्र, दुसऱ्या सीझनमध्ये त्याला फक्त शॉ रनरची भूमिका देण्यात आली. त्यानंतर तो पुन्हा सेक्रेड गेम्सच्या सेटवर आला नाही.