ETV Bharat / sitara

दिमाखदार सोहळ्यात ‘६६ सदाशिव’चे पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच - Yogesh Deshpande

‘६६ सदाशिव’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर यापूर्वी भेटीस आले होते. यावेळी चित्रपटाचा टीझर आणि म्यूझिक लॉन्च करण्यात आले आहे. अभिनेता मोहन जोशींसह चित्रपटाची टीम यावेळी हजर होती.

मोहन जोशी, ६६ सदाशीव पोस्टर लॉन्च
author img

By

Published : Apr 16, 2019, 7:56 PM IST

एक मुलगा सामान्य आवाजात वाचतोय ‘पावसाची रिपरिप चालू आहे’, मध्येच त्याला अडवत एक व्यक्ती ‘अरे सेकंड सेमिस्टर नां’, मुलगा 'येस सर', मग ती व्यक्ती ‘आवाज वाढवून बोल’, पुढे तो मुलगा एकदम खड्या आवाजात ‘पावसात गाड्या उडवून कुणाच्या कपड्यावर चिखलाची बेलबुट्टी करतो रे’ काय अचंबित झालात ना? हा मुलगा नक्की काय वाचतोय? आणि मध्येच सेमिस्टर, येस सर सारखे शब्द कसे आले? अशी प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण करणाऱ्या '६६ सदाशिव’ या चित्रपटाचा पोस्टर, टीजर आणि म्युझिक लाँच सोहळा दिमाखात संपन्न झाला. या चित्रपटाची निर्मिती ‘पुणे टॉकिज प्रा. लि.’ यांची असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

या प्रसंगी चित्रपटाचे निर्माते हेमंत गुजराथी, विनय वाकलकर, सौरभ चिंचणकर, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, संगीतकार नरेंद्र भिडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सांस्कृतिक राजधानी असलेले पुणे शहर वाद विवादासाठी प्रसिद्ध आहे, याच पुण्यात ६६ वी कला अर्थात शास्त्रशुद्ध वाद घालण्याच्या शिकवणी भोवती '६६ सदाशिव’ची कथा असल्याचे या टीजर मधून दिसते. यापूर्वी आलेल्या पोस्टर मध्ये ‘६६' व्या कलेत पारंगत होण्यासाठी उपयुक्त अभ्यासक्रम!’ अशा आशयाचे एक पुस्तक मोहन जोशी यांच्या हातात दिसते. या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची जी उत्सुकता निर्माण झाली होती ती या भन्नाट टीजर मधून अधिक ताणली गेली आहे.

'६६ सदाशिव’ चित्रपटात मोहन जोशी, वंदना गुप्ते, प्रविण तरडे, योगेश देशपांडे, अपूर्वा मोडक, प्रणव रावराणे, विशाखा सुभेदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत, तर महेश मांजरेकर, आसावरी जोशी, विजय निकम विशेष भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात तीन गाणी असून नरेंद्र भिडे यांचे संगीत आहे. एका वेगळ्या कलेची ओळख करून देणारा ’६६ सदाशिव’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.