ETV Bharat / sitara

कोणत्याही उद्योगात जाण्यासाठी '3 इडियट्स' माझे व्हिजिटिंग कार्ड : आर. माधवन - 'थ्री इडियट्स' आर. माधवनच्या आयुष्यातील खास चित्रपट

'थ्री इडियट्स' हा चित्रपट अभिनेता आर. माधवनच्या आयुष्यातील सर्वात खास चित्रपट आहे. '3 इडियट्स' माझ्यासाठी कोणत्याही उद्योगात जाण्याचे व्हिजिटिंग कार्ड आहे, असे त्याने म्हटलंय.

R Madhavan
आर. माधवन
author img

By

Published : Dec 24, 2020, 7:31 PM IST

मुंबई - अभिनेता आर. माधवन म्हणतो की २००९ मध्ये आलेला ब्लॉकबस्टर 'थ्री इडियट्स' हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंडआवडला होता. याचा त्याच्या आयुष्यावर खोलवर परिणाम झाला होता, म्हणूनच हा त्याच्या करिअरचा आणि त्याच्या आयुष्यातील आणि नेहमीचा सर्वात खास चित्रपट आहे. यावर्षी ख्रिसमसच्या दिवशी या चित्रपटाला ११ वर्षे पूर्ण होतील. या खास प्रसंगी माधवनने चित्रपटाशी संबंधित आपल्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा दिला.

अभिनेता म्हणाला, '3 इडियट्स' हा माझ्या कारकिर्दीचा आणि माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा चित्रपट असेल कारण त्याचा तरुणांवर विशेष प्रभाव पडला होता. '3 इडियट्स' माझ्यासाठी कोणत्याही उद्योगात जाण्याचे व्हिजिटिंग कार्ड आहे. कारण जगभरातील लोक त्यांना हिंदी माहित असो वा नसो या चित्रपटामुळे मला आदर देतात. मला असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात इतर कोणत्याही चित्रपटाला इतके महत्त्वाचे स्थान आहे. "

हेही वाचा - रजनीकांतच्या 'अण्णात्थे' चित्रपटाचे शुटिंग कोरोनामुळे थांबले

राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात माधवनसह आमिर खान, शर्मन जोशी, बोमन इराणी, मोना सिंग, करीना कपूर खान, ओमी वैद्य या कलाकारांनीही अभिनय केला होता.

हेही वाचा - नव्वदच्या दशकापासून सुपरस्टार्सचे युग मंदावाले - पंकज त्रिपाठी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.