मुंबई- श्रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिज तिच्या फिटनेस बद्दल अत्यंत जागरूक असते. भारतीय योगाभ्यासाला तिने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनविला आहे. ती सकाळी ‘बुलेटप्रूफ कॉफी’ चा आस्वाद घेते. ‘बुलेटप्रूफ कॉफी’ आरोग्यासाठी चांगली असते असे एक्सपर्ट्स सांगतात. “सकाळचा योगा आणि ‘बुलेटप्रूफ कॉफी’ मला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते. ‘वह ही हैं मेरे फिटनेस का राज', जॅकलिन म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ‘ती मॉर्निंग पर्सन आहे. कामाच्या जबाबदाऱ्या सुरू होण्यापूर्वी मला माझ्यासाठी पुरेसा वेळ मिळाल्यामुळे माझा दिवस लवकर सुरू करणे मी पसंत करते.
व्यावसायिक जीवनाचे योग्य संतुलन असणे आवश्यक
जॅकलिन फर्नांडिजसाठी २०२१ वर्षे खूप व्यस्त असणार आहे. तिच्या कारकीर्दीत प्रगती होत आहे. तसेच तिचे वैयक्तिक जीवनही समृद्ध होत चालले आहे. मुंबईसारख्या ठिकाणी एकटीनेच राहताना येणाऱ्या संकटांचा आणि विविध प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो असे ती सांगते. ‘आपल्याकडे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाचे योग्य संतुलन असणे आवश्यक आहे आणि त्यासाठी मी दररोज सकाळी डायरी लिहिते ज्यामुळे माझ्या विचारांना योग्य दिशा देऊ शकेल. मग मी साफसफाई, किराणा सामान आणि जेवणाचा मेनू तयार करण्यासाठी एक तास खर्च करते. स्वतंत्रपणे जगण्यामुळे स्वातंत्र्य मिळते पण त्याबरोबर बरीच आव्हानेही येतात’, असे जॅकलिन म्हणाली.
मोठ्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये जॅकलिनची वर्णी
जॅकलिनने तिच्या कामाच्या ठिकाणी असणारी आव्हाने नक्कीच स्वीकारली आहेत. जॅकलिन आपल्या घरासोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल याचीही काळजी घेते. जॅकलिन २०२१ मध्ये मोठ्या बॅनरच्या चित्रपटात झळकणार आहे. ज्यामध्ये बच्चन पांडे, किक २, भूत पोलीस आणि सर्कस चित्रपटांचा सामावेश आहे.