ETV Bharat / sitara

‘यशराज फिल्म्स’ तर्फे आदित्य चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुरू केली लसीकरण मोहीम - yash raj films on corona vaccination

मनोरंजनसृष्टीतही काही निर्माते आणि निर्मिती संस्था त्यांच्या युनिट्स आणि क्रूचे लसीकरण करीत आहेत, ज्यात भर पडलीय यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्राची देखील.

‘यशराज फिल्म्स’ तर्फे आदित्य चोप्रा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीसाठी सुरु केली लसीकरण मोहीम

author img

By

Published : Jun 13, 2021, 9:34 PM IST

मुंबई - कोरोना महामारीवर तोडगा म्हणून केलेल्या लस निर्मितीमुळे मानव जातीला थोडाफार दिलासा मिळाला आहे. आपल्या देशानेही आत्मनिर्भर बनत कोविड-१९ वर लस निर्माण केलीय आणि भारतीयांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. प्रचंड लोकसंख्या आणि मर्यादित लससाठा यामुळे लसीकरण केंद्रांवर तुडुंब गर्दी होऊ लागली. ज्याने कोरोनवाढीला चालना मिळण्याची शक्यता होती. आठवड्याभरापूर्वीच राज्य शासनाने हाऊसिंग सोसायटीज आणि इतर मोठ्या कंपन्यांना आपापल्या लोकांना त्यांच्यातर्फेच लसीकरण करण्याची मुभा दिलीय. मनोरंजनसृष्टीतही काही निर्माते आणि निर्मिती संस्था त्यांच्या युनिट्स आणि क्रूचे लसीकरण करीत आहेत, ज्यात भर पडलीय यशराज फिल्म्स आणि आदित्य चोप्राची देखील.

आदित्य चोप्रा यांनी या लसीकरण मोहिमेसाठी आपल्या वायआरएफ स्टुडिओचे दरवाजे सर्वांसाठी उघडले आहेत. महिन्याभरापूर्वीच आदित्य चोप्राने हिंदी फिल्म इंडस्ट्रीतील कामगारांच्या लसीकरणाबाबत आश्वस्त केले होते आणि आता त्यांनी लसीकरण मोहिमेची सुरवात केली असून इंडस्ट्रीतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कृतीमुळे मीडिया आणि एंटरटेन्मेन्ट इंडस्ट्रीतील काम पुन्हा जोमाने सुरू होईल अशी आशा आदित्य यांनी व्यक्त केली आहे. पहिल्या टप्प्यात कमीतकमी ४००० कामगारांचे लसीकरण करण्यात येईल. वायआरएफने प्रतिज्ञा केली आहे की ते एफडब्ल्यूआयसीई (फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज) च्या ३०,००० नोंदणीकृत सदस्यांना लवकरात लवकर लस देण्याचा प्रयत्न करेल. या निर्मितीसंस्थेने आपल्या कर्मचार्‍यांना मुंबईतील वायआरएफ स्टुडिओत आधीच लस दिली आहे.

यशराज फिल्म्सचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अक्षय विधानी म्हणाले, की “वायआरएफ मधील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण केल्यानंतर आम्ही आमच्या हिंदी चित्रउद्योगातील कामगारांना लस देण्यास सुरुवात केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीसाठी लसीकरण मोहीम सुरू केल्याचा आम्हाला आनंद आहे. यामुळे आमच्या उद्योगातील दैनंदिन वेतन मिळवणार्‍यांना कामावर परत येण्यास आणि स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता देण्यास चालना मिळेल. हे लसीकरण अभियान टप्प्याटप्प्याने राबवावे लागेल. पहिल्या टप्प्यात आम्ही कमीतकमी ३५००-४००० लोकांना रोगप्रतिबंधक लस देण्यास सक्षम आहोत. यशराज फिल्म्स तथा वायआरएफ कोरोनाच्या जबरदस्त त्रासाने ग्रस्त असलेला फिल्मउद्योग पुन्हा सुरू करण्यात मदतीचा हात देण्यासाठी वचनबद्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.