मुंबई - अभिनेत्री-निर्माता अनुष्का शर्मा हिने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी) फायनल सामन्याच्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टॉसची झलक शेअर केली आहे. अनुष्का तिचा क्रिकेटपटू पती विराट कोहलीसह साऊथॅम्प्टन, इंग्लंडमध्ये त्यांची ५ महिन्यांची मुलगी वामिका कोहलीसोबत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ही झलक तिने चाहत्यांसी दाखवली आहे.
शनिवारी अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टॉस केल्याचा फोटो शेअर केला. " बेडरूमच्या बाल्कनीतून आजचा टॉस," असे अनुष्काने हसत हसत आणि क्रिकेट बॅट इमोजीसह या पोस्टला कॅप्शन दिले आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये ओव्हरसिस्ट परिस्थितीत नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध फलंदाजीचा निर्णय घेतला.
हेही वाचा - 'स्कॅम १९९२' स्टार प्रतीक गांधीसोबत चित्रपटात रोमान्स करणार विद्या बालन