मुंबई - पॉर्न फिल्मचे शुटिंग करीत असल्याच्या गुन्ह्याखाली राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली आहे. तो पॉर्न व्हिडिओ बनवून अॅपवर अपलोड करीत असे, असा त्याच्यावर आरोप आहे. मंगळवारी त्याला न्यायालयाने 23 जुलैपर्यंतची पोलीस कस्टडी दिली आहे.
राज कुंद्रा याच्या विरोधात गुन्हा पूर्वीच दाखल झाला होता. त्याच्या विरोधातील चार्जशीट एप्रिलमध्येच फाईल झाली होती. त्यामुळे त्याला अटक करण्यात उशीर का झाला याबद्दल क्राईम विभागाचे जॉईंट पोलीस कमिशनर मिलींद भारंबे यांनी सांगितले की, अनेक इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासून केस मजबूत करायची होती. पैशांचा व्यवहार, खात्यांच्या खऱ्या मालकांचा शोध, कंटेंट आणि पब्लिशर यांची तपासणी करुन कारवाई करायची होती असेही ते पुढे म्हणाले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पोलिसांना अनेक बँक खात्यांमध्ये झालेले व्यवहार आढऴून आले याबद्दल बोलताना भामरे म्हणाले, राज कुंद्रा यांची जी वियान नावाची कंपनी होती त्यांचे केनरीन नावाच्या कंपनीसोबत टायप होते. केनरीन ही कंपनी लंडन स्थित आहे. राज कुंद्राच्या बहिणीच्या नवऱ्याची मालकीची ही कंपनी आहे. त्याचे हॉट शॉट्स नावाचे एक अॅप होते. या कंपनीचे सर्व कॉन्टेंटची निर्मिती, या अॅपचे ऑपरेशन्स, याचे अकाउंटिंग राज कुंद्राच्या मालकीच्या वियान या कंपनीच्या मुंबईतील ऑफिसमधूनच होत होते. या प्रकरणाचा सखोल तपास करीत असताना हे सर्व धागेदोरे सापडले आहेत. यामध्ये काही व्हट्सअप ग्रुप, इमेल्स, अकाऊंट शीट्स सापडल्या आहेत. हॉटशॉट्सवर ज्या चित्रफिटी प्रसारित झाल्या त्याही सापडल्या आहेत. काल कोर्टाची परवानगी घेऊन त्याच्या ऑफिसचा तपास केला. यात या महत्त्वाच्या गोष्टी सापडल्या आहेत.
हेही वाचा - शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला २३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा