ETV Bharat / sitara

राजकुमार राव क्रिकेट खेळताना भूमी पेडणेकरला म्हणतोय ‘बधाई दो’!

author img

By

Published : Feb 1, 2021, 7:02 PM IST

नुकताच भूमी पेडणेकरने जंगल पिक्चर्सच्या ‘बधाई दो’ च्या सेटवर राजकुमार राव क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ बनविला आहे. हा ‘बीटीएस’ व्हिडिओ राजकुमार रावने शेयर केलाय. सेटवरील माणसं गोळा करून तो क्रिकेट खेळला. भूमी पेडणेकरही त्यांच्यात सामील झाली होती व तिने ‘सिनेमॅटोग्राफर’ ची भूमिका निभावत विरंगुळ्याचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

while-playing-cricket-rajkumar-rao
राजकुमार राव क्रिकेट खेळताना

मुंबई - आपल्या देशात क्रिकेट आणि चित्रपट हे प्रांत प्रचंड लोकप्रिय आहेत. दोघांनाही ग्लॅमरचं वलय असल्यामुळे दोन्ही क्षेत्रातले सेलिब्रिटीज एकमेकांना ‘फॉलो’ करत असतात. काही क्रिकेटर्स मनोरंजनसृष्टीत दिसतात तर काही कलाकार क्रिकेट खेळताना. आता हेच बघाना. नुकताच भूमी पेडणेकरने जंगल पिक्चर्सच्या ‘बधाई दो’ च्या सेटवर राजकुमार राव क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडीओ बनविला आणि तो ‘बीटीएस’ शेयर केलाय राजकुमार रावने. साधारणतः कुठल्याही चित्रपट वा मालिकेच्या सेटवर फावल्या वेळात क्रिकेट खेळलं जातं व बऱ्याच ठिकाणी स्त्री कलाकारही त्यात हिरीरीने भाग घेताना दिसतात.

राजकुमार राव क्रिकेट खेळताना

भूमीने टिपले विरंगुळ्याचे काही क्षण

‘बधाई दो’ चे चित्रीकरण गेल्याच महिन्यात डेहराडून येथे सुरु झाले. ‘काम, काम आणि काम करून फक्त कंटाळाच येतो’ असे म्हटले जाते आणि म्हणून विरंगुळा महत्वाचा असतो आणि त्यामुळेच ‘बधाई दो’ चे ‘बॅक-टू-बॅक’ सीन्स केल्यावर शीण घालविण्यासाठी राजकुमारने सेटवरील माणसं गोळा करून क्रिकेट खेळला. भूमी पेडणेकरही त्यांच्यात सामील झाली होती व तिने ‘सिनेमॅटोग्राफर’ ची भूमिका निभावत विरंगुळ्याचे काही क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले.

गल्ली क्रिकेट खेळल्याने टीम उत्साही

या चलचित्र प्रतिमेत, राजकुमार उत्साही दिसतोय, ज्याने या चित्रपटासाठी मिश्या ठेवल्या आहेत, आणि क्रिकेट खेळताना आपली बॅट पराजताना दिसतोय. त्याचे फॅन्स त्याला ‘चियर’ करताना दिसताहेत. ‘मैदानात क्रिकेट खेळण्याची मजा काही औरच आहे’ असे म्हणत राजकुमाराने गल्ली क्रिकेटमधील आठवणी जागवल्या. एक टप्पा आउट, त्या भिंतीला लागले तर आउट, ई. नियम इथे लागू नसल्याबद्दल म्हटले ‘बधाई दो’. ‘गल्ली क्रिकेटचे नियम मैदानात लागू नसल्याने आमची संपूर्ण शूट-टीम क्रिकेट खेळून ताजीतवानी झाली’, असे राव याने सांगितले.

‘सिनेमॅटोग्राफर’ भूमीने समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली, त्यात लिहिले, ‘#सुमीडायरीज आणि #बधाईदो फुल टाइम, टाइम पास’ व राजकुमार राव आणि जंगली पिक्चर्स यांना ‘टॅग’ करतेय म्हणत पुढे लिहिले, “व्हिडीओ पाहताना ‘जितेगा भाई जितेगा’ चे म्युझिक तुम्हाला वेगळीच अनुभूती देईल”

राजकुमार राव आणि भूमी पहिल्यांदाच एकत्र

‘बधाई दो’ हा ‘बधाई हो’ या फ्रँचायझीचा एक भाग आहे जो बॉक्स ऑफिसवर त्याच्या नर्मविनोदी आणि अपारंपरिक कथानकासाठी हिट ठरला होता. जंगली पिक्चर्सने राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांची फ्रेश जोडी बनवलीय. दोघेही पहिल्यांदाच एकमेकांसोबत काम करताहेत आणि पूर्णपणे वेगळ्या अवतारात दिसणार आहेत.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही नाही, निवडणूक असलेल्या राज्यांसाठी हात सैल - भुजबळ

‘बधाई दो’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या उत्तराखंडमध्ये होत असून या चित्रपटाला अधिक मनोरंजक बनवण्याच्या दृष्टीने कलाकारांचे विस्तृत शूटिंग सुरु आहे. अक्षत घिल्डियाल व सुमन अधिकारी यांनी लिहिलेले कथानक असलेल्या ‘बधाई दो’ ची निर्मिती जंगली पिक्चर्सने केली असून हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.