ETV Bharat / sitara

VIDEO: दोन कलाकार, एक युद्ध ; हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं टीझर प्रदर्शित - tiger shroff

हृतिक आणि टायगरची जोडी लवकरच एका आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करताना दिसणार असून वॉर असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.

हृतिक-टायगरच्या 'वॉर'चं टीझर प्रदर्शित
author img

By

Published : Jul 15, 2019, 12:10 PM IST

मुंबई - आपल्या जबरदस्त अॅक्शन सीनसाठी ओळखले जाणारे बॉलिवूड कलाकार म्हणजेच टायगर श्रॉफ आणि हृतिक रोशन. हृतिक आणि टायगरचे खास अॅक्शन सीन पाहण्यासाठी त्यांचे चाहतेही आतुर असतात. अशात अॅक्शनचा तडका घेऊन चाहत्यांचे मनोरंजन करण्यास हे दोन्ही कलाकार सज्ज झाले आहेत.

हृतिक आणि टायगरची जोडी लवकरच एका आगामी चित्रपटात स्क्रीन शेअर करतान दिसणार असून वॉर असं या चित्रपटाचं शीर्षक आहे. प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत असलेल्या या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये टायगर आणि हृतिकमधील वॉरची आणि त्यांच्या अॅक्शनची झलक पाहायला मिळत आहे.

टीझरसोबतच चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. सिद्धार्थ आनंदद्वारा दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी, तेलुगू आणि तमिळ अशा तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या २ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सिनेमागृहात दाखल होणार आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.