मुंबई - विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या स्वीत्झर्लँडमध्ये सुट्टीचा आनंद लुटत आहेत. दरम्यान त्यांची भेट अभिनेता वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल यांच्यासोबत झाली.
या जोडप्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात चारही सेलेब्रिटी बर्फाळलेल्या पहाडांमध्ये आनंदाने पोज देताना दिसत आहेत.
अनुष्काने हा फोटो शेअर करीत आपल्यासोबत वरुण आणि नताशा दलाल असल्याचे लिहिलंय. तर वरुणने आपल्या कॅप्शनमध्ये 'माऊंटनचे मित्र' असे लिहित विराट आणि अनुष्काचा उल्लेख केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
या सुट्टीच्या काळात केवळ अनुष्का आणि विराटच नाही तर करिश्मा आणि करिना कपूर सिस्टर्स यांचीही भेट वरुणशी स्वीत्झर्लँडमध्ये झाली आहे.
अभिनेत्री करिश्मानेही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करीत वरुण धवनसोबतचा फोटो शेअर केलाय.
अलिकडेच वरुण धवनचा 'स्ट्रीट डान्सर थ्रीडी' या चित्रपटाचा धमाकेदाकर ट्रेलर रिलीज झाला होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेमो डिसुझा याचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात प्रभूदेवा आणि श्रध्दा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.