ETV Bharat / sitara

विकास गुप्ताने लिहिली भावुक पोस्ट, अंकिताला म्हटले सुशांतची ‘शॉक अ‌ॅब्सॉर्बर’

author img

By

Published : Jun 19, 2020, 2:52 PM IST

'बिग बॉस' फेम विकास गुप्ताने सुशांतसिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांच्यातील संबंधांबद्दलच्या सुंदर गोष्टी सांगितल्या. अंकिता सुशांतसाठी शॉक अ‌ॅब्सॉर्बर कशी होती आणि तिने कोणत्याही अडचणीत त्याला एकटे सोडले नाही, याबद्दल सांगितले.

vikas-gupta
विकास गुप्ताने लिहिली भावुक पोस्ट

मुंबई - टीव्ही निर्माता विकास गुप्ता यांनी दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची माजी मैत्रीण अंकिता लोखंडे हिला त्याचा ‘शॉक अ‌ॅब्सॉर्बर’ म्हटले आहे.

हे दोन्ही कलाकार ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत एकत्र दिसले होते. गुरुवारी सकाळी सुशांतची पहिली टीव्ही मालिका 'किस देश में है मेरा दिल' चे क्रिएटिव्ह दिग्दर्शक विकास गुप्ता यांनी त्यांच्यासाठी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

विकास यांनी ‘पवित्र रिश्ता’च्या सेटवरील एक फोटो शेअर करत लिहिलंय, ''याच वेळी जेव्हा मी सुशुला, निश्चिंत, मजेत आणि आनंदी पाहिला होता. त्याला कशाचीही चिंता नव्हती. तो भारतीय टेलिव्हिजनवर प्रथम क्रमांकाचा कार्यक्रम सोडू शकत होता आणि आम्ही काही आठवडे काही न करता, केवळ चहा, कॉफी आणि बिस्किटांवर योजना बनवित होतो. चित्रपट बनवण्याच्या योजनांवर चर्चा करायचो. मला आठवतेय की, त्याने 'औरंगजेब'ला नाही म्हटले होते कारण त्याला भावाचा रोल मिळाला होता. मला आठवतेय त्याने मला विचारले की, यश राजला नाही कसे सांगू, परंतु हे त्याने केले कारण या फोटोत मधोमध दिसणारी जी वेडी मुलगी आहे तिने सुशांतला सांगितले की, तू तेच कर ज्याच्यात तुला आनंद मिळेल. कोणत्या गोष्टीच्याबाबतीत खात्री असते तेव्हाच निर्णय घे. अंकिताचे हे ऐकून तेव्हा तसेच हासायला लागला जसा की तो या फोटोत हसतोय.''

विकास पुढे लिहितात, ''परिणीती चोप्रासोबत त्याला सिनेमा मिळावा अशी आमची इच्छा होती कारण त्याने 'इश्कजादे'मध्ये एक अद्भुत काम केले होते. या शोबद्दल त्याला सांगणे इतके मोठे ठरले की त्याला 'काय पो छे' सिनेमा मिळाला आणि त्याने मला 'पीके' सिनेमा साईन केल्याचे सांगितले होते. त्याने 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपट परिणीतीसोबत साईन केल्याचेही सांगितले होते. या आनंदात अंकिताने मित्रांना आपल्या घरी बोलवले होते. आता फक्त आठवणी उरल्या आहेत.''

हेही वाचा - साहिल म्हणतो, ''नाव मोठे आणि लक्षण खोटे... ओळखा पाहू कोण?''

त्यांनी शेवटी लिहिलंय, ''सुशांतला मला एक हासरा मुलगा म्हणून आठवणीत ठेवायचाय कारण अंकिताला पाहून त्याचा सर्व त्रास पळून जात होता. अंकिता तू सुशांतसाठी शॉक अॅब्सॉर्बर होतीस. जोपर्यंत पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर हास्य येत नव्हते तोपर्यंत तू त्याला सोडत नव्हतीस.''

14 जून रोजी सुशांतचा मृतदेह त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये सापडला होता, तेव्हापासून संपूर्ण मनोरंजन उद्योग शोकात गुंतला होता. सुशांतवर १५ जून रोजी मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. काल त्याच्या मुळ शहरात म्हणजे पटना येथील गंगा नदीमध्ये त्याच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले होते.

हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : पोलिसांनी नोंदवला कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीचा जवाब

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.