ETV Bharat / sitara

‘सनक’ अभिनेता विद्युत जामवालने जळत्या काचेचा दरवाजा फोडून घेतली एन्ट्री! - ‘सनक’ चित्रपट डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार

विद्युत जामवाल अभिनित ‘सनक’ हा चित्रपट लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्याआधी झालेल्या इव्हेंटमध्ये विद्युत जामवालने आग लागलेला काचेचा दरवाजा फोडून एन्ट्री घेतली आणि आपल्या या ‘लाईव्ह हाई-ऑक्टेन स्टंटने’ सगळ्यांना थक्क केले.

विद्युत जामवाल
विद्युत जामवाल
author img

By

Published : Oct 7, 2021, 10:53 PM IST

कोरोना महामारीचा विळखा सैल होत चालल्यामुळे सिनेजगतात चित्रपट प्रदर्शनाची चढाओढ लागली आहे. महाराष्ट्रातील चित्रपटगृहे उघडण्यासाठी अजून काही वेळ लागणार असला तरी काही निर्माते आपले तयार चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करीत आहेत. विद्युत जामवाल अभिनित ‘सनक’ हा चित्रपट लवकरच डिज्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्याआधी झालेल्या इव्हेंटमध्ये विद्युत जामवालने आग लागलेला काचेचा दरवाजा फोडून एन्ट्री घेतली आणि आपल्या या ‘लाईव्ह हाई-ऑक्टेन स्टंटने’ सगळ्यांना थक्क केले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

‘सनक’ मध्ये एक हॉस्पिटल ओलीस ठेवण्यात आले आहे आणि त्याभोवती कथानक फिरते. या चित्रपटाच्या एका कार्यक्रमावेळी विद्युत जामवालने एका जळत्या एलईडी स्क्रीनला तोडत कार्यक्रमात बहारदार एंट्री घेतली आणि दर्शकांना चकित केले. या निमित्ताने 'सनक'च्या निर्मात्यांनी उपस्थित सर्वांना लाईव्ह ऍक्शनचा अनुभव दिला ज्यामध्ये विद्युत जामवालला जवळून बघण्याची संधी मिळाली, जेव्हा अभिनेत्याने स्क्रीनचा चक्काचूर करत एक हीरोइक एंट्री घेतली.

विद्युत जामवाल
विद्युत जामवाल

विद्युत जामवाल म्हणाला की, “‘सनक’ मधून आम्ही दर्शकांसाठी अत्यंत थरारक अनुभव देण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याद्वारे आधी करण्यात आलेल्या सर्व ऍक्शन दृश्यांपेक्षा हटके काही करणे रोमांचक होते. माझ्या नेहमीच्या चित्रपटांपेक्षा वेगळा असा ‘सनक’ आहे आणि यात अत्यंत धाडसी ऍक्शन बघायला मिळेल. प्रेक्षकांना 'सनक' नक्की भावेल त्यातील ऍक्शन आणि भावनिकतेमुळे.”

विपुल अमृतलाल शाह प्रॉडक्शन निर्मित आणि कनिष्क वर्मा दिग्दर्शित 'सनक'मध्ये प्रेक्षकांसमोर एक अनोखी शैली सादर करण्यात आली आहे, जिचा वापर यापूर्वी चित्रपटांतून झालेला नाही. या चित्रपटात विद्युत जामवाल, चंदन रॉय सन्याल, नेहा धूपिया यांच्या भूमिका असून बंगाली स्टार रुक्मिणी मैत्रा बॉलीवुडमध्ये पदार्पण करत आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर डिज्नी+ हॉटस्टारवर स्ट्रीम होण्यास पूर्णपणे सज्ज असून भावनात्मक सीन्स आणि नेक्स्ट लेवल ऍक्शनने ओतप्रोत भरलेला हा चित्रपट आहे. हा चित्रपट असून याचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा यांनी केले आहे.

निर्माते विपुल शाह म्हणाले की, "सनक - होप अंडर सीज' एक ऍक्शनने भरपूर असा थ्रिलरपट असून, याचे कथानक एक व्यक्ती आपल्या प्रेमासाठी काय करू शकतो याच्या आसपास फिरते आणि हाच या कथेचा मुख्य गाभा आहे. प्रेम तुम्हाला कुठे नेऊ शकते याला काही सीमा नाही. आम्हाला बंगाली सुपरस्टार रुक्मिणी मैत्राला 'सनक'च्या माध्यमातून हिंदी सिनेसृष्टीत सादर करताना आनंद होतो आहे. डिज़्नी+ हॉटस्टारसोबत सहयोग करणे आनंददायक आहे कारण चित्रपट चांगल्या तऱ्हेने चर्चेत राहण्यासाठी ते काहीच कसर सोडत नाहीयेत आणि आजच्या या मोठया इव्हेंटला देखील त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने सादर केले आहे."

विद्युत जामवाल, चंदन रॉय सान्याल, नेहा धूपिया आणि या चित्रपटाद्वारे बॉलीवुडमध्ये डेब्यु करणारी बंगाली अभिनेत्री रुक्मिणी मैत्रा अभिनीत, 'सनक - होप अंडर सीज' झी स्टूडियोजद्वारे सनशाइन पिक्चर्स प्राइवेट लिमिटेडच्या सहयोगाने प्रस्तुत करण्यात येत असून १५ ऑक्टोबरपासून डिज्नी+ हॉटस्टार मल्टीप्लेक्सवर स्ट्रीम करेल.

हेही वाचा - हृतिक रोशनने आर्यन खानसाठी लिहिली पोस्ट : देव कणखर व्यक्तींची परीक्षा घेत असतो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.