मुंबई - बॉलिवूडचा स्टंटमॅन विद्युत जामवालच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. त्याच्या 'खुदा हाफिज' या आगामी चित्रपटाचे शूटींग नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनौमध्ये सुरू झाले आहे. या चित्रपटाचे शूटींग शेड्यूल म्हणजे रोलरकोस्टर राईड असल्याचे विद्युतने म्हटले आहे.
'खुदा हाफिज' या आगामी चित्रपटाचे शूटींग विद्युतने गेल्या वर्षीच सुरू केले आहे. ऑक्टोबर महिण्यात उझबेकिस्तानमध्ये याचे पहिले शेड्यूल पार पडले होते. आता निर्मात्यांनी लखनौ आणि मुंबईत शूटींग करण्याचा निर्णय घेतलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विद्युत जामवालला आपण 'कमांडो'च्या तीन भागामध्ये आणि गेल्या वर्षी आलेल्या 'जंगली' या चित्रपटात अॅक्शन करताना पाहिले आहे. आजपर्यंतच्या भूमिकांहून ही वेगळी भूमिका असल्याचे त्याने म्हटलंय. त्यामुळे एक त्याच्या चाहत्यांसाठी हा आनंददायी अनुभव ठरु शकतो.
'खुदा हाफिज' या चित्रपटाचे दिग्दर्शन फारुक कबीर करीत आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असेल. अलिकडेच 'ये साली आशिकी' चित्रपटात अमरीश पुरीचा नातू वर्धन पुरीसोबत झळकलेली अभिनेत्री शिवालिका ओबेरॉय आणि विद्युतची जोडी खुदा हाफिजमध्ये असेल.