मुंबई - १९९० मध्ये काश्मिर खोऱ्यातून काश्मिरी पंडित हद्दपार झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिकारा हा चित्रपट दिग्दर्शन केलेले विधु विनोद चोप्रा पुन्हा एकदा एक वेड लावणारा थ्रिलर चित्रपट बनवणार आहेत. ‘बारिश’ असे या चित्रपटाचे शीर्षक असेल.
जयपुर साहित्य महोत्सवादरम्यानच्या एका सत्रामध्ये विदु विनोद चोप्रांनी ही घोषणा केली. अभिजात जोशी लिखित 'अनस्क्रिप्टेड: कन्व्हर्शन्स ऑन लाईफ अॅन्ड सिनेमा' या पुस्तकावर बोलताना चोप्रा यांनी आपल्या पुढील चित्रपटाचे नाव 'बारीश' असल्याचा खुलासा केला.
"मी पुरस्कार घ्यायलाही जात नाही. बहुतेक लोकांना मी आवडत नाही आणि मला त्यापैकी बहुतेक आवडत नाहीत त्यामुळे मला हे योग्य वाटते. माझ्यासाठी जॉनर फार महत्त्वाचा नसतो. रोज एकच प्रकारचे खाद्य पदार्थ खाणे कंटाळवाणे नसते का? शिकारानंतर मी बारीश नावाच्या चित्रपटावर काम करीत आहे, जो एक थ्रिलर चित्रपट आहे. वेगवेगळ्या जीवनांचा वेध घेण्यात मला अर्थ वाटतो. माझ्या गरजा मर्यादित आहेत. जीवन हे सिनेमाहून जास्त श्रेष्ठ आहे.'' , असे राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या विधु यांनी सांगितले. 'बारीश' हा एक चकित करणारा थ्रिलर चित्रपट असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - मनोरंजक :राजकुमार हिराणीच्या चित्रपटात शाहरुखसोबत तापसी पन्नू