मुंबई - बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित सर्वच भारतीयांच्या दृष्टीने उत्कृष्ठ डान्सर आहे. तिचे डान्स व्हिडिओ नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरतात. सध्या ती 'डान्स दिवाने' हा डान्स रिएलिटी शो जज करीत आहे. या शोमधील तिचे व्हिडिओ अधून मधून व्हायरल होत असतात. अलीकडेच या शोमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनने भाग घेतला. शो दरम्यान माधुरी दीक्षित आणि रवीना टंडन यांची जुगलबंदीही प्रेक्षकांनी पाहिली. या दोन्ही अभिनेत्रींनी एकाच मंचावर उत्तम नृत्य आणि परफॉर्मन्सने चाहत्यांची मने जिंकली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
माधुरी दीक्षितने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओही शेअर केला आहे. यामध्ये ती आणि रवीना टंडन डान्स करताना दिसत आहेत. माधुरीने शेअर केलेला व्हिडिओ दीड लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. चाहत्यांसह सेलेब्रिटीजही यावर बरीच प्रतिक्रिया देत आहेत.
माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचे तर ती सध्या 'डान्स दिवाना' शोमध्ये परिक्षक म्हणून काम करताना दिसत आहे. शोच्या सेटमधील तिचे अनेक डान्स व्हिडिओ दररोज व्हायरल होतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - माझी तब्येत जॉन अब्राहम एवढी ‘अमेझिंग’ नसली तरी चांगली आहे’ - शाहरुख खान