मुंबई (महाराष्ट्र ) - अभिनेता विकी कौशल ( Vicky Kaushal ) सध्या इंदूरमध्ये त्याच्या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मग्न आहे. शूटिंगचा अनुभव मजेदार बनवण्यासाठी तो शुटिंग टीमसह मैदानात उतरला आणि क्रिकेट खेळाचा आनंद ( Enjoy playing cricket ) घेतला. बुधवारी, विकीने इंस्टाग्रामवर त्याचा सेटवरील क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला. "सेटवर क्रिकेटसाठी वेळ काढण्यापेक्षा काहीही चांगले नाही," असे त्याने क्लिपला कॅप्शन दिले आहे.
शुटिंग संपल्यानंतर तो अनेक गंमती करीत असतो. यापूर्वीही त्याने असे अनुभव सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अद्याप शीर्षक नसलेल्या चित्रपटात विकीसोबत सारा अली खान स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. दिनेश विजन दिग्दर्शित या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, विकीसोबत त्याची अभिनेत्री पत्नी कॅटरिना कैफ इंदूरमध्ये ( Katrina Kaif in Indore ) सामील झाली होती. पतीसोबत लोहरी साजरी करण्यासाठी कॅटरिना मुंबईहून इंदूरला पोहोचली होती. त्यावेळी कॅटरिनाने तिच्या इंस्टाग्रामवर हसऱ्या फोटोंची एक मालिका शेअर केली होती.
हेही वाचा - Dhanush Aishwaryaa Split : Rgv म्हणतो 'हुशार लोक प्रेम करतात आणि ढ लग्न'