मुंबई - करण जोहर दिग्दर्शित 'तख्त' चित्रपटाची काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटात प्रेक्षकांना विकी कौशल, रणवीर सिंग, आलिया भट्ट, करिना कपूर खान, जान्हवी कपूर, भूमी पेडणेकर आणि अनिल कपूर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटात रणवीर सिंग शाहजहानचा मुलगा दारा शिकोहची तर विकी कौशल औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे. यात आलिया विकी कौशलसोबत ऑन्सक्रीन रोमांस करताना दिसणार आहे. एका मुलाखतीदरम्यान चित्रपटातील कोणाची भूमिका तुला सर्वाधिक भावली असा प्रश्न विकीला केला असता त्याने आलियाचे नाव घेतले. चित्रपटातील आलियाची भूमिका मॅजिकल असल्याचे विकीने म्हटले आहे.
दरम्यान, ऐतिहासिक कथानकावर आधारित बिग बजेट चित्रपट आणि त्यासोबतच मोठी स्टारकास्ट यांमुळे प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.