मुंबई - अभिनेत्री करिना कपूरने वरुण धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केला आहे. अलिकडेच झालेल्या करिनाच्या 'व्हॉट वूमेन वॉन्ट' या रेडिओ शोमध्ये वरुणनची गर्लफ्रेंड नताशा दलाल हिचा 'मंगेतर' असा उल्लेख केला. शोचा गेस्ट म्हणून आलेल्या वरुण धवनने यावेळी आपल्या खासगी आयुष्य आणि लग्न याबद्दल मोकळेपणाने बातचीत केली.
करिनाशी बोलताना वरुण धवनने खुलासा केला की, नताशा दलालने त्याचे लग्नाचे प्रपोजल तीन चार वेळा नाकारले होते, पण तो हिंमत हरला नाही. वरुणने नताशाला पहिल्यांदा सहावीच्या वर्गात असताना पाहिले होते. दोघेही १२ वीपर्यंत चांगले मित्र बनले होते. तो नताशाला लंच ब्रेकच्यावेळी बास्केटबॉल कोर्टमध्ये येता-जाताना पाहायचा.
कोण आहे वरुणची गर्लफ्रेंड नताशा?
नताशा दलाल एक फॅशन डिझायनर आहे. तिने न्यूयॉर्कमधून फॅशनचे शिक्षण घेतले. नताशाचे सर्व कुटुंबिय दिल्ली वास्तव्याला असते. ती फॅशन डिझयनर असूनही प्रसिध्दीपासून दूर असते. अनेकवेळा ती वरुणसोबत कॅमेऱ्यात कैद झालेली आहे.
लहानपणापासून नताश आणि वरुणची ओळख
वरुण धवन आणि नताशा लहानपाणापासूनच एकमेकांना ओळखतात. मोठे झाल्यानंतर दोघांची पुन्हा एका म्यूझिक कॉन्सर्टमध्ये भेट झाली होती. त्यानंतर त्यांचे भेटत राहाणे सुरू झाले. आता त्यांचे हे भेटणे संसार सुरू करण्यापर्यंत पोहोचले आहे.
हेही वाचा - ड्रग्ज प्रकरण : करण जोहरकडून 'तो' व्हिडिओ एनसीबीला सुपूर्द..
लग्न करण्याविषयी बोलताना वरुण म्हणाला, ''पाहा, जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा त्यात काही गैर नाही. जेव्हा तुम्ही कोणासाोबत इतके काळ एकत्र आहात आणि चांगल्या प्रकारे ओळखता तेव्हा लग्न करणे योग्य आहे. मी जेव्हा भावाला आणि वहिनीला पाहिले तेव्हा लग्न करण्याबाबतची जाणीव झाली. जेव्हा मी पुतणी नायराला पाहिले तेव्हा हे चांगले वाटले."
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यात अडचणी
वरुण धवनने हाही खुलासा केला की दोघांना लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. मात्र कुटुंबीयांना आम्ही लग्न करावे असे वाटायचे. तो म्हणाला की, ''नताशा आणि तिचे पालक याबाबतीत खूप रिलॅक्स आहेत. मला वाटतं की एक विशिष्ठ कालावधीनंतर वाटायला लागते की आपण एकत्र राहिले पाहिजे. लिव्ह इन रिलेशनमध्ये काही अडचण नव्हती परंतु आई वडिलांना वाटायचे की मी लग्न करावे.''
हेही वाचा - 'रश्मी रॉकेट'साठी तापसी पन्नू घेतेय कठोर प्रशिक्षण, नवीन फोटो केले शेअर