मुंबई - अभिनेता वरुण धवनने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपले बालपणीचे मित्र असल्याचे म्हटलंय. हा व्हिडिओ आता व्हायरल झालाय.
आता हा व्हिडिओ वरुणने डिलीट केलाय. परंतु त्याच्या चाहत्यांनी मात्र इंटरनेटवर व्हायरल केलाय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अनेक फॅन पेजवर हा व्हिडिओ शेअर झालाय. आपल्या व्हॅनिटीच्या बाहेर अमेरिकन झंड्याच्या ब्लेझरमध्ये आपला दोस्त शिराज पटेलसोबत दिसत आहे.
शिराजसोबत वरुणने गप्पा मारताना ट्रम्प लहानपणीचे मित्र असल्याचे म्हटलंय. इतकेच नाहीतर ते घरी येणार असून त्यांना पावभाजी खाऊ घालणार असल्याचेही व्हिडिओत म्हटलंय.
त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर वरुण धवन कुली नं. १ मध्ये काम करत आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खान हिची जोडी पाहायला मिळणार आहे. गोविंदा आणि करिश्मा कपूरच्या हिट चित्रपटाचा हा रिमेक आहे.