मुंबई - अभिनेत्री वाणी कपूरचे तीन मोठे बॉलिवूड चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहेत. तिच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट असल्याचे ती मानते. येत्या काही महिन्यात वाणी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'बेल बॉटम' मध्ये दिसणार आहे, 'शमशेरा'मध्ये ती रणबीर कपूरसोबत दिसणार आहे आणि त्याशिवाय आयुष्मान खुरानाची मुख्य भूमिका असलेल्या 'चंडीगढ़ करे आशिकी'चासुद्धा ती एक भाग असणार आहे.
अभिनेत्री वाणी पुढे म्हणाली, "हे वर्ष माझ्या कामाच्या दृष्टीने चांगले आहे हे मी नाकारू शकत नाही. मला अशा संधी मिळत असल्याचा आनंद आहे. मी इतकी व्यग्र कधीच नव्हते."