मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट बुधवारी हॅक झाले होते. एका दिवसानंतर गुरुवारी ते पुन्हा सुरू करण्यात आले. अकाऊंट पुन्हा करण्यासाठी त्वरित कारवाई केल्याबद्दल गुरुवारी दुपारी उर्मिला यांनी इंस्टाग्राम आणि मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. मात्र त्यांच्या काही पोस्ट अजूनही गायब असल्याची तक्रार अभिनेत्री उर्मिला यांनी केली आहे.
उर्मिला यांनी लिहिलंय, "...आणि मी परत आले. तुमच्या पाठिंब्याबद्दल इंस्टाग्राम आणि मुंबई पोलिसांचे आभार. पण माझ्या काही पोस्ट अजूनही गहाळ आहेत. माझ्या इंस्टा परिवाराला खूप खूप प्रेम."
हेही वाचा - अन्याय हीच संपूर्ण जगातील स्थिती आहे : ब्रायन क्रॅन्स्टोन
बुधवारी उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाले होते.
हेही वाचा - संजना सांघीने 'ओम' वर काम केले सुरू