ETV Bharat / sitara

लोकांना सुरक्षित राहण्याचे आवाहन करणारी करिना कपूर ट्रोल - कोविड सेफ्टीसाठी करिना ट्रोल

लोकांना सुरक्षा नियम पाळण्याचे आवाहन सोशल मीडियावर करणाऱ्या करिना कपूर खानला ट्रोल करण्यात आले आहे. करिनाची सावत्र मुलगी सारा अली खान आणि चुलत भाऊ रणबीर कपूरल काही दिवसापूर्वी सुट्टीचा आनंद घेऊन भारतात परतले आहेत त्यांनाही ज्ञानामृत पाजण्याचा सल्ला करिनाला मिळाला आहे.

trolls-remind-kareena-
करिना कपूर ट्रोल
author img

By

Published : Apr 30, 2021, 5:06 PM IST

मुंबई - अभिनेत्री करिना कपूरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन सर्वांनी कोरोना साथीच्या काळात सुरक्षा नियमांचे पालन करण्याची विनंती केली आहे.

आुल्या इन्स्टाग्रामवर करिनाने म्हटलंय की सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य अजूनही लोकांना समजत नाही. तिने लिहिलंय, ''हे समजून घेणे माझ्यासाठी अकल्पनिय आहे की अद्यापही काही लोकांना देशातील सद्य स्थितीचे गांभीर्य लक्षात येत नाही.''

करिनाने पुढे लिहिलंय, ''पुढच्यावेळी घराबाहेर पाऊल टाकताना किंवा हनुवटीवर मास्क घालताना किंवा नियमांचा भंग करताना डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफचा विचार करा. ते मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या ब्रेकिंग पॉईंटवर आहेत. तुमच्यातील प्रत्येकजणाने हे वाचणे साखळी तोडण्यासाठी आवश्यक आहे. आता पूर्वीपेक्षाही आपल्याला भारताची जास्त गरज आहे. "

करिनाच्या या पोस्टला लाखोंच्या संख्येने प्रतिक्रिया मिळत आहेत. असे असले तरी तिच्यावर टीकाकारांचीही नजर पडली आहे. करण जोहरसोबत केलेल्या पार्टीची तिला काहींनी आठवण करुन दिली आहे. करिनाची सावत्र मुलगी सारा अली खान आणि चुलत भाऊ रणबीर कपूरल काही दिवसापूर्वी सुट्टीचा आनंद घेऊन भारतात परतले आहेत त्यांनाही ज्ञानामृत पाजण्याचा सल्ला करिनाला मिळाला आहे.

"प्लिज तुझ्या चुलत भावालाही समजावं तो प्रेयसीसोबत मालदिवमध्ये सुट्टी घालवून परतला आहे, असे एका युजरने लिहिलंय." तर दुसऱ्याने म्हटलंय, "तू तुझ्या गर्ल गँगसोबत आहेस का आणि करण जोहरसोबत पार्टी करीत आहे, का?"

तर आणखी एकाने लिहिलंय, "अपने भाई रणबीर को और अपनी गर्ल गँग को समझाओ, वही सब मालदिव में घुम रहे थे."

भारतात लोक साथीच्या आजाराशी लढत असताना सेलेब्रिटी मात्र परदेशात मजामस्ती करताना दिसतात. सोशल मीडियावर त्यांच्या सुट्टीचे फोटो आणि व्हिडिओ ते पोस्ट करीत असतात. यापूर्वी अमित साध, नवाझुद्दीन सिद्दीकी, लेखिका शोभा डे आणि सेलिब्रिटी मॅनेजर रोहिणी अय्यर यांनीही विदेशी सुट्टीचे फोटो पोस्ट केलेल्या सेलिब्रिटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा - ‘इंडिया इस ब्लीडींग’; कोविड निधी उभारण्यासाठी ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा करतेय प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.