मुंबई - अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला होता. ट्रेलरला प्रेक्षकांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला होता. पण आता या चित्रपटाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. अशी बातमी आहे की, निर्मात्यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे नाव बदलून 'लक्ष्मी' केले आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आज सेन्सॉर प्रमाणपत्रसाठी गेले होते. यावेळी सीबीएफसीशी झालेल्या चर्चेनंतर प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन चित्रपटाचे निर्माते शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटाचे शीर्षक 'लक्ष्मी' करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
NEW DEVELOPMENT... #LaxmmiBomb title changed... New title: #Laxmii... Premieres 9 Nov 2020 on #DisneyPlusHotstarVIP... Stars #AkshayKumar and #KiaraAdvani. pic.twitter.com/P1K35OXNuN
— taran adarsh (@taran_adarsh) October 29, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">NEW DEVELOPMENT... #LaxmmiBomb title changed... New title: #Laxmii... Premieres 9 Nov 2020 on #DisneyPlusHotstarVIP... Stars #AkshayKumar and #KiaraAdvani. pic.twitter.com/P1K35OXNuN
— taran adarsh (@taran_adarsh) October 29, 2020NEW DEVELOPMENT... #LaxmmiBomb title changed... New title: #Laxmii... Premieres 9 Nov 2020 on #DisneyPlusHotstarVIP... Stars #AkshayKumar and #KiaraAdvani. pic.twitter.com/P1K35OXNuN
— taran adarsh (@taran_adarsh) October 29, 2020
या बातमीनंतर अक्षय कुमार आणि कियारा अडवाणीचा हा चित्रपट आता 'लक्ष्मी' या नावाने ओळखला जाईल. चित्रपटाचा प्रीमिअर 9 नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपीवर होईल. या वृत्ताला चाहत्यांनीही बऱ्याच प्रतिक्रिया दिल्या आहेत. यापूर्वीही अनेक संघटनांनी चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती.
हेही वाचा- अभिनेत्री निया शर्माला आला 'मुंबई पोलिसां'च्या तत्परतेचा अनुभव
अक्षय कुमारचा 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाचा ट्रेलर केवळ 24 तासात 70 दशलक्ष वेळा पाहाण्यात आला होता. यामुळे चित्रपटाबद्दलचे मोठे आकर्षण प्रेक्षकांमध्ये असल्याचे लक्षात आले होते. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यापूर्वी हा चित्रपट यावर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार होता, परंतु कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लक्ष्मी बॉम्बची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती.
दाक्षिणात्य अभिनेता राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा हिंदी भाषेतील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. फॉक्स स्टार स्टुडिओ आणि केप ऑफ गुड फिल्म्सच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार झाला आहे.